शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

मुक्त विद्यापीठाच्या प्रलंबित परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या असून या लांबलेल्या परीक्षा २० पासून ...

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी, पदव्युत्तर परीक्षा लांबल्या असून या लांबलेल्या परीक्षा २० पासून सुरू होण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील संभाव्य वेळापत्रक जून अखेरपर्यंत किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील अंतिम परीक्षा मे-जून २०२० मध्ये होणार होत्या. परंतु कोरोना संकटामुळे या परीक्षा पुढे ढकलून ऑक्टोबर २०२० मध्ये ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. ४ नोव्हेंबरपर्यंत या परीक्षा पूर्ण झाल्यानंतर परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. परंतु, त्यानंतर एका महिन्याच्या कालावधीत डिसेंबर २०२० मध्ये सत्र परीक्षा घेणे शक्य नसल्याने त्या मार्चमध्ये घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र मार्चमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढल्याने या परीक्षा मे २०२१ मध्ये या परीक्षा घेतल्या आहे. त्यामुळे दरवर्षी नियमितपणे मे-जूनमध्ये होणाऱ्या परीक्षाही लांबणीवर पडल्या असून आता या परीक्षा जुलैच्या मध्यावधीत सुरू होणार असल्याची माहिती परीक्षा विभागाकडून देण्यात आली आहे. त्यासाठी जून अखेर अथवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात संभाव्य वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी संकेतस्थ‌ाळावर दिल्या जाणाऱ्या सूचनांनुसार परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक शशिकांत ठाकरे यांनी दिली आहे.