शहरं
Join us  
Trending Stories
1
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
2
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
3
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
4
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
5
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
6
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
7
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
9
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
10
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
11
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
12
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
13
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
14
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
15
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
16
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
17
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
18
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
19
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
20
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी

दंडही हवाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 00:56 IST

पाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा.

साराशकिरण अग्रवालपाणी पावसापासून उद्भवणाºया साथीच्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारने जे स्वच्छता अभियान सुरू केले आहे त्यास नाशकातही उदंड प्रतिसाद मिळाला ही बाब चांगलीच म्हणायची; पण अशा एकदिवसीय उत्सवी आयोजनाने यामागील मूळ हेतू साध्य होईल का, हा प्रश्नच ठरावा. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर दरवर्षीच अशी स्वच्छता मोहीम राबविली जाते. नित्य-नैमित्तिक पातळीवर जी सफाई राहून जाते ते ‘ब्लॅक स्पॉट’ हेरून ते यानिमित्ताने स्वच्छ केले जातात. त्यामुळे अशा मोहिमा उपयोगी निश्चितच ठरतात. पण त्या राबविल्या जाताना त्याकडेही केवळ शासकीय उपचार म्हणून पाहणाºयांची संख्या मोठी असल्याने पालकमंत्री गिरीश महाजन म्हणतात त्याप्रमाणे, जनजागृतीसह दंडात्मक कारवाईची तरतूद केली जाणेही आवश्यकच ठरावे. विशेष म्हणजे नाशकात स्वच्छता पंधरवड्याच्या पहिल्याच दिवशी तब्बल ३५० टन कचरा संकलित केला गेला. यासाठी २८ हजारांवर नागरिकांचा सहभाग लाभला, ज्यात शाळकरी विद्यार्थ्यांचे प्रमाणही लक्षणीय होते. पण या गर्दीत विद्यार्थी व सामान्य नागरिक ज्या प्रामाणिकपणे सफाई करताना दिसून आले, तसे शासकीय कर्मचारी व राजकीय कार्यकर्त्यांच्या बाबतीत अपवादानेच दिसू शकले. स्वत: पालकमंत्री महाजन सक्रियपणे स्वच्छता करत असताना अनेकांनी त्यांच्या पाठीमागे उभे राहात ‘सेल्फी’ काढून चमकोगिरी करण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून आले. सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांची अशी मानसिकता असताना विरोधी पक्षीयांनीही यासाठी फारसा उत्साह किंवा सहभाग दाखविलेला दिसून येऊ शकला नाही. उलट अशी मोहीम एक दिवस राबवून फोटोसेशन करून घेण्याऐवजी रोज स्वच्छतेची काळजी घेतल्यास अशा मोहिमा राबविण्याची वेळ येणार नाही, अशी टीका केली. अर्थात, आपल्याकडील एकूणच मानसिकता लक्षात घेता, विशेषत्वाने काही मोहिमा हाती घेतल्याखेरीज उद्देशित कामे पार पडत नाहीत. त्यामुळे जे केले गेले ते चांगलेच झाले, फक्त त्याबद्दलची जाणीव रुजविली जाणे गरजेचे आहे. पालकमंत्री महाजन म्हणतात त्याप्रमाणे स्वच्छता हा खरेच सवयीचा भाग आहे. त्यामुळे ही आपल्या स्वत:पासून सुरू करून अंगवळणी पडणे गरजेचे आहे. शिवाय, अस्वच्छता करणाºयांवर दंडात्मक कारवाई केली गेल्याखेरीज ही सवय लागणार नाही. शहरातील कचºयाची ठिकाणे निश्चित करून तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, त्याद्वारे अस्वच्छता करणारे शोधण्याचा विचारही महाजन यांनी बोलून दाखविला आहे. तेव्हा, तसे झाले तर खरेच त्याचा परिणाम दिसून येऊ शकेल. विनामूल्य मिळणाºया वस्तूबाबत जसे कुणाला गांभीर्य नसते, तसे कारवाईची अगर दंडाची भीती असल्याशिवाय नागरिकांना शिस्त लागत नाही, हे खरे असल्याने पालकमंत्र्यांनी त्याबाबत निर्णय घेतल्यास सुज्ञ नाशिककर त्याचे स्वागतच करतील.