शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

माहिती दडवल्यास केबलचालकाला दंड

By admin | Updated: August 18, 2015 00:10 IST

शपथेवर प्रमाणपत्र : माहिती देण्यास सात दिवस मुदत

नाशिक : केबल व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक केबलचालकाने आपल्याकडील ग्राहकांची माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करावी, त्याने दिलेल्या माहितीत तफावत आढळल्यास कमीत कमी ५० हजार रुपये दंडाची कार्यवाही करण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. राज्य शासनाने जून महिन्यात केबलचालक व करमणूक कराबाबत धोरण ठरवून त्याला राजपत्रात प्रसिद्धी देण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रत्येक केबलचालकाने तसेच एमएसओ म्हणजेच मल्टी सिस्टीम आॅपरेटरर्स यांनी आपल्या ग्राहकांची अचूक माहिती शंभर रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर सादर करतानाच, त्यासाठी शासनाने घालून दिलेली शपथ घोषित करावयाची आहे. या संदर्भात दोनच दिवसांपूर्वी जिल्हा प्रशासनाने शहरातील सर्व केबलचालकांची बैठक घेऊन शासनाच्या निर्णयाची माहिती दिली. सध्या दर महिन्याला जिल्ह्यातील सर्व केबलचालकांची सोडत पद्धतीने चिठ्या टाकल्या जातात व ज्या केबलचालकाची चिठ्ठी निघेल त्याच्या सर्व केबल संख्येची तलाठ्यांमार्फत तपासणी केली जाते. केबलचालकाने दिलेली माहिती व प्रत्यक्षात आढळून आलेली जोडणीत तफावत आढळल्यास केबलचालकाकडून वाढीव जोडणीचा कर वसूल केला जात आहे. त्याच पद्धतीने आता केबलचालक शपथेवर सादर करणाऱ्या जोडणीच्या माहितीची खातरजमा करण्यात येणार आहे. येत्या सात दिवसांत ही माहिती सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)