शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

शांतता, निवडणुका सुरू आहेत !

By admin | Updated: February 14, 2017 01:23 IST

महापालिकेची नकारघंटा : नागरी कामांबाबतही टाळाटाळ

नाशिक : महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राबत असलेली यंत्रणा आणि सध्या लागू असलेली आदर्श आचारसंहिता यामुळे सर्व कामकाज ठप्प झाले आहे. राजीव गांधी भवनात निरव शांतता असून, नागरी कामांसाठी नागरिक येत नाही आणि आले तरी त्यांचे काम होत नाही. अगदी आरोग्य विभागापासून सर्वच खात्यात गेल्यानंतर सध्या निवडणुकांची कामे आहेत, नंतर या असे सांगून बोळवणूक केली जात आहे.  महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची धामधूम सुरू आहे. निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने अगोदरच कोणतेही काम होत नाही. त्यात आता बहुतांशी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर निवडणूक कामांची जबाबदारी असल्याने त्याचा परिणाम पालिकेच्या अन्य कामांवर झाला आहे. राजीव गांधी भवनात अधिकारी आणि कर्मचारी भेटत नाहीत, भेटले तर सध्या निवडणुकीची धावपळ सुरू आहे. पुढील महिन्यात या, असे सांगितले जात आहे. निवडणुकांमुळे मुळातच नगरसेवक किंवा अन्य राजकीय कार्यकर्ते महापालिकेकडे  फिरकत नाहीत, परंतु पालिकेत नकारघंटा ऐकण्यास येत असल्याने नागरिकांचेही येणे कमी झाले आहे. त्यामुळे राजीव गांधी भवनात जेमतेमच वावर असतो.नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोयकेवळ महापालिकेच्या मुख्यालयातच नव्हे तर सर्वच विभागीय कार्यालयांमध्ये अशीच अवस्था आहे. विभागीय कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची कामे होत नाही. अस्वच्छतेपासून ते जन्ममृत्यू दाखल्याच्या कामासाठी गेलेल्या नागरिकांना पंधरा - वीस दिवसांनंतर या आता कर्मचारी निवडणूक कामासाठी गेले आहेत, असे सांगण्यात येत असून त्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. मनपाच्या वतीने तक्रार निवारणासाठी अ‍ॅप तयार करण्यात आले आहे. मात्र, त्याची दखल घेण्यासाठी अधिकारी, कर्मचारी नाहीत अशी परिस्थिती आहे.