शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वेतन रखडले : कुष्ठ व क्षयरोग विभागाला झाला क्षय

By admin | Updated: December 20, 2014 00:36 IST

राज्यातील १६०० कर्मचाऱ्यांची उपासमार

प्रवीण साळुंके   मालेगावराज्यात अनुदानाअभावी आरोग्य विभागाच्या कुष्ठ व क्षयरोग विभागाच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नाही. त्यामुळे १६०० कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यात मालेगाव शहरातील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या आरोग्यविभागाच्या आडमुठे भुमिकेमुळे पाच महिन्यापासून मानधनापासून वंचित राहावे लागले आहे. राज्यात आरोेग्य विभागाच्या अंतर्गत कुष्ठ व क्षयरोग विभागाच्या क्षयरोग नियंत्रण सोसायटीतर्फे कुष्ठ व क्षयरोग निदान कार्यक्रम सुुरू आहे. या विभागात मानधनावर १६०० कर्मचारी व अधिकारी कार्यरत असून, या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून मानधन मिळालेले नसल्याने उपासमारीची वेळ आली आहे. या कर्मचाऱ्यांना जून महिन्यांचे मानधन देण्यात आले होते. त्यानंतर गेल्या चार महिन्यात त्यांना वेतन न मिळाल्याने दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मालेगाववगळता इतर ठिकाणच्या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन देण्यात आले आहे. यासाठी या विभागाचे पुणे येथील सहसंचालकांनी १४ आॅक्टोबर २०१४ रोजी राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्तांना पत्र पाठवून ‘अनुदान प्राप्त होईपर्यंत आपल्या फंडातून सदर कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी उसनवार पैसे देण्याची विनंती केली होती. या पत्राला राज्यातील इतर महापालिकांनी माणुसकीच्या भावनेतून प्रतिसाद देत दिवाळीसाठी या कर्मचाऱ्यांना जुलै महिन्याचे वेतन अदा केले होते. यात मालेगाव महानगरपालिका अपवाद ठरली होती. येथील मनपात सदर पत्रावर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी आरोग्यधिकाऱ्यांना लेखी दिले होते. मात्र येथील आरोग्यधिकाऱ्यांनी या पत्राला केराची टोपली दाखविल्याने शहरात काम करणाऱ्या १४ कर्मचाऱ्यांना वेतन अदा केले नाही. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पाच महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. राज्यात २००९ साली या सोसायट्या वेगळ्या करण्यात आल्या आहेत. या कर्मचाऱ्यांना मानधन देण्यात येत असून, त्यासाठी शासनातर्फे अनुदान दिले जाते. हे अनुदान जिल्हा परिषद, महानगरपालिकांकडे वर्ग करण्यात येते. त्यानंतर सदर महापालिका किंवा जिल्हापरिषद, पंचायत समिती कर्मचाऱ्यांना मानधनाचे किंवा वेतनाचे वाटप करत असते. शासनाने या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालावे अन्यथा क्षयरोग नियंत्रणाचे काम थांबून या रोगाचे रुग्ण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.