शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
5
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
6
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
7
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
8
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
9
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
10
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
11
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
12
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
13
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
14
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
15
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
16
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
17
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
18
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
19
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात पतंजलीची गुंतवणूक

By admin | Updated: December 21, 2016 22:55 IST

गिरीश महाजन : ‘आयमा इंडेक्स- २०१७’च्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन

सातपूर : योगगुरू रामदेवबाबा आपल्या पतंजलीच्या उत्पादनासाठी नाशिकला मोठी गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. ही गुंतवणूक नाशिकला झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. या प्रकल्पासाठी जिल्हा प्रशासनाला जागेचा शोध घेण्यास सांगितले आहे. पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिली. आयमा औद्योगिक प्रदर्शन- २०१७च्या माहिती पुस्तिकेच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. महाजन यांनी सांगितले की, शहराच्या विकासात औद्योगिक वसाहतीचे मोठे योगदान आहे. मात्र औद्योगिक वसाहतीला मूलभूत सुविधा पुरेशा मिळत नाहीत हे सत्य आहे. कदाचित विमानतळामुळे अडथळा येत असेल, मात्र नाशिकच्या उद्योग विकासासाठी शासन स्तरावर निश्चित असे प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही देत योगगुरु रामदेवबाबा नाशिकमध्ये गुंतवणूक करण्यास तयार असल्याची सुखद माहिती त्यांनी यावेळी दिली.  आयमाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांनी प्रास्ताविक केले व स्वागत केले, तर आयमा इंडेक्स २०१७ चे अध्यक्ष धनंजय बेळे यांनी या प्रदर्शनाची सविस्तर माहिती दिली व औद्योगिक प्रदर्शनासाठी नाशिकला कायमस्वरूपी जागा उपलब्ध करून द्यावी. त्या जागेवर प्रदर्शन केंद्र उभारून त्याचे व्यवस्थापन एमआयडीसी किंवा डीआयसी यांच्याकडे द्यावे, अशी मागणी केली. सूत्रसंचालन वरुण तलवार यांनी केले. स्वागत एस. एस. आनंद यांनी केले. निखिल पांचाळ यांनी आभार मानले. यावेळी आयमाचे माजी अध्यक्ष विवेक पाटील, आमदार सीमा हिरे, आमदार देवयानी फरांदे, कामगार उपायुक्त गुलाबराव दाभाडे, सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, महेश हिरे, संजय महाजन, आशिष नहार, प्रकाश बारी, व्हीनस वाणी, राजेंद्र कोठावदे, श्रीधर व्यवहारे, मंगेश काठे, नेहा म्हैसपूरकर, शर्मिला साळी, प्रज्ञा पाटील, प्रेरणा बेळे, महेश सुतार आदिंसह उद्योजक उपस्थित होते. (वार्ताहर)