शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांचे शहराध्यक्ष वादाच्या भोवऱ्यात

By admin | Updated: February 17, 2017 23:42 IST

उमेदवारीत अर्थकारण : वाद निवडणूक आयोगाकडे

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने नाशिक शहरातील बहुतांशी राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष वादात सापडले आहेत. यातील भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप आणि कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर यांच्यातील वाद तर निवडणूक आयोगाच्या पटलावर गेला असून, शिवसेनेतील प्रकरण तर हातघाईवर गेल्यामुळे काही पक्षांच्या शहराध्यक्षांच्या विरोधात वातावरण पेटले असून, निवडणुकीनंतर त्यांचे आणखी वेगळे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.  महापालिका निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या अधिक होती. काही अन्य पक्षांतून आलेले तर काही अगदी तासाभरापूर्वी दाखल झालेल्या इच्छुकांना उमेदवारी मिळाल्याने हे दोन्ही पक्ष वादाच्या भोवऱ्यात सापडले. भाजपाचे शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्यावर पक्षांतर्गत आरोप झाले, शिवाय निवडणुकीसाठी तिकीट विक्री झाल्याचे दोन कथित व्हिडीओ व्हायरल झाल्याने भाजपाला मोठा धक्का बसला.  शिवाय यासंदर्भात निवडणुकीच्या आचारसंहिता कक्षाने दखल घेतली. त्यामुळे भाजपाचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांच्याबरोबरच निवडणुकीत उमेदवारी करणाऱ्या ११९ उमेदवारांना निवडणूक अधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या. शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचा उमेदवारी वाटपावर वरचष्मा असल्याने साहजिकच ते वादात सापडले आहेत.  शिवसेनेचे महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनाही उमेदवारीप्रकरणी अनेक आरोपांना  सामारे जावे लागले. माजी महापौर विनायक पांडे यांच्या चिरंजीवांना उमेदवारी नाकारल्याने तर पांडे यांनी बोरस्ते यांच्यावर अन्य उमेदवाराकडून लाखो रुपये घेऊन तिकीट दिल्याचा आरोप केला. त्यानंतर बोरस्ते यांना मारहाण झाली. दुहेरी एबी फॉर्म वाटप, काहींना झेरॉक्स तर काही उमेदवारांना कोरे एबी फॉर्म दिल्याचे अनेक घोळ शिवसेनेत गाजले.  कॉँग्रेसमध्ये अशाच प्रकारे शहराध्यक्ष शरद अहेर यांनादेखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले आहे. विशेष म्हणजे या पक्षाकडे उमेदवारांची वानवा आहे. परंतु काही मोजक्या प्रभागात उमेदवारीसाठी सारेच जण इरेला पेटले होते. त्यातून शहराध्यक्षांनी मनसे आणि अपक्षांशी युती केल्याच्या तक्रारी झाल्याच, परंतु कॉँग्रेस भवनाला टाळे ठोकण्यापर्यंत प्रकार घडले.