शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण सोडतीकडे पक्षांचे लक्ष

By admin | Updated: August 21, 2016 22:19 IST

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक : इगतपुरी तालुक्यात मोर्चेबांधणी करण्यास प्रारंभ

 घोटी : राज्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदेचा पाच वर्षांचा कार्यकाल यावर्षी संपुष्टात येत असल्याने आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काढण्यात येणाऱ्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने इगतपुरी तालुक्यात मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व जागा जिंकण्यासाठी तसेच इगतपुरी पंचायत समिती ताब्यात घेण्यासाठी सर्वच पक्षांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्रत्येक प्रबल पक्षाकडून गट व गणनिहाय आढावा बैठका घेऊन आगामी रणनीती ठरविण्याकडे सर्वच राजकीय पक्षांचा कल वाढला आहे.इगतपुरी तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मागील निवडणुकीत आघाडी आणि युतीचे स्वप्न भंग पावले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसे या राजकीय पक्षांनी स्वबळावर ही निवडणूक लढविली होती. यात जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादी व शेकाप वगळता इतर पक्षांना खातेही उघडता आले नव्हते, तर पंचायत समितीत काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला प्रत्येकी तीन जागा, मनसेला दोन, तर शिवसेना व अपक्षाला एक जागा मिळाली होती. संभाव्य निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची भिस्त केवळ आरक्षण सोडतीकडे असून, कोणत्या गटात कोणते आरक्षण जाहीर होते आणि कोणत्या गणात काय आरक्षण होणार, याबाबत तालुक्यात राजकीय समीकरणे तयार करण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे.तालुक्यातील पाच गटांपैकी धारगाव, नांदगाव सदो व खेड हे गट अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची दाट शक्यता आहे, तर घोटी व वाडीवऱ्हे हे गट इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. गणांपैकी घोटी हा गण लोकसंख्येच्या आधारावर अनुसूचित जातीसाठी आरक्षित होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे.दरम्यान, या निवडणुकांपूर्वी तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याचे चित्र निर्माण झाले असून, अनेक इच्छुक पक्षांतर करण्याच्या तयारीत आहेत. (वार्ताहर)