डांगसौंदाणे : येथील श्री स्वामी समर्थ विद्या प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक मेळावा झाला. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वाघ होते.शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते. पालकवर्गाला आपल्या पाल्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी प्रश्न मांडण्यासाठी तसेच पाल्यांच्या गुणवत्तावाढीसाठी कोणते नवीन उपक्रम राबविण्यात यावे यासाठी या पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पाल्यांच्या गुणवत्तेबाबत पालकवर्गाकडून समाधान व्यक्त करण्यात आले.यावेळी शाळेकडून विविध उपक्रम साजरे करण्यात आले. त्याचे व्हिडीओ चित्रीकरण प्रोजेक्टरद्वारे दाखविण्यात आले. शाळेच्या विद्यार्थ्यांनी रोटरी क्लब आॅफ मालेगाव यांनी आयोजित केलेल्या कला, क्रीडा स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसे वाटप करण्यात आली. यावेळी साहेबराव बिरारी, सचिन वाघ, गणेश सोनवणे, महेंद्र सोनवणे, मुन्ना सोनवणे, अनिल सोनवणे, विजय महाजन, मोहन चिंचोडे, नितीन बोरसे, मोहन बागुल, विजय दुसाने, अमोल खैरनार, रवींद्र निकम, आवेश शहा, वैशाली सावकार, रोशनी शेख, सीमा बिरारी, शालिनी जगताप आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमलसिंग सोळंके यांनी केले. सचिन केल्हे व सोनल ठाकरे यांनी आभार मानले. (वार्ताहर)
डांगसौंदाणे स्कूलमध्ये पालक मेळावा
By admin | Updated: September 27, 2016 23:11 IST