शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसाच्या खुनाच्या गुन्ह्यात परमवीर सिंग यांनीच अडकवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:17 IST

नाशिक : वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या ...

नाशिक : वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे दुखावलेले तत्कालीन पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनीच मला सुभद्रा पवार या पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा धक्कादायक आरोप नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या मुख्यालयातील पोलीस उपअधीक्षक श्यामकुमार निपुंगे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. आर्थिक गैरव्यवहाराचे परमवीर सिंग हेच सूत्रधार असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी त्यांनी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात १४ जून रोजी फिर्याद दिली आहे.

राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन १९८८ साली पोलीस खात्यात रुजू झालेले निपुंगे हे २०१६ साली भिवंडी येथील वाहतूक शाखेत कर्तव्य बजावत असताना बेकायदेशीर वाहतुकीसंदर्भात काही भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्यांविषयी तक्रारी आल्याने त्यांनी अवजड वाहनचालकांचे जबाब नोंदवून चौकशी सुरू केली होती. या वेळी तत्कालीन पोलीस आयुक्त असलेले परमवीर सिंग यांनी त्यांची तडकाफडकी बदली केली होती.

ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केली होती. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. या आरोपांबाबत बोलताना निपुंगे म्हणाले, मी नारपौली येथील गैरव्यवहाराची माहिती संकलित करण्यास सुरुवात केली होती. त्या ठिकाणी कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक थेट परमवीर सिंग यांचे नाव घेऊन एक कोटी रुपये देऊन बदली घेतल्याचे सांगत होते. सुभद्रा पवार हिची हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे याने केल्याचे परिस्थितीजन्य पुरावे समोर आले होते; मात्र सुभद्रा, अमोल फफाळे आणि सुभद्राचा भाऊ सुजीत पवार यांच्यातील संभाषण न्यायालयात सादर केले गेले नाही. तसेच शवविच्छेदनाचे रेकॉर्डिंग करण्यात आले. छायाचित्र घेण्यात आले होते. प्रत्यक्ष फिर्याद आणि हे पुरावे यांची सांगड नसल्याने ते पुरावेही दाबण्यात आले. २०१७ साली मी सर्व कागदपत्रे मिळविण्यात सुरुवात केली. सुभद्रा पवार हिच्या हत्या प्रकरणात माझा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट केले. पुराव्यांची सांगड आणि जुळवाजुळव सुरू असल्याने आता ही तक्रार करीत असल्याचे निपुंगे यांनी स्पष्ट केले.

या गुन्ह्यात गोवले गेल्यामुळे माझी बदनामी होऊन पोलीस खात्यात प्रतिमा मलिन झाल्याचे त्यांनी सांगितले. आडगाव पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीमध्ये त्यांनी परमवीर सिंग यांच्यासह विविध अधिकाऱ्यांवर आपापसांत कट रचून संगनमताने अधिकारपदाचा दुरुपयोग करून खोटे पुरावे तयार करत सुभद्रा यांच्या खुनाच्या गुन्ह्यात गोवल्याचा आरोप केला आहे. त्यांनी अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत पुराव्यानिशी फिर्याद दिली आहे.

--

या अधिकाऱ्यांविरोधात तक्रार

तत्कालीन आयुक्त परमवीर सिंग यांच्यासह पोलीस आयुक्त मधुकर पांडे, पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी, सहायक आयुक्त रमेश धुमाळ, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुक्तार अली बागवान, अमोल फफाळे यांच्याविरोधात ॲट्रोसिटीसह कट रचणे व इतर कलमांनुसार श्यामकुमार निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात २२ पानी तक्रार केली आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करत आहेत.

--