शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पेपरलेस संकेतस्थळ शिक्षकांना उपयुक्त ठरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:21 IST

दाभाडी - शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी व्हावी. शालेय कामकाजात अध्यापनासाठी पूर्ण वेळ मिळाला. यासाठी दैनंदिन काम पेपरलेस व्हावे यासाठी ...

दाभाडी - शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी व्हावी. शालेय कामकाजात अध्यापनासाठी पूर्ण वेळ मिळाला. यासाठी दैनंदिन काम पेपरलेस व्हावे यासाठी शिक्षण विभागाचे संकेतस्थळ उपयुक्त ठरावे असे प्रतिपादन पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा देसाई यांनी केले. शिक्षण विभागातर्फे संकेतस्थळाच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी पंचायत समिती सदस्य अरूण पाटील, कमळाबाई मोरे, शंकर बोरसे, गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, गटशिक्षणाधिकारी दिलीप गायकवाड उपस्थित होते.

देसाई म्हणाल्या की, हायटेक प्रणाली असताना कागद काम वाढत असल्याने या संकेतस्थळावर मोबाईलवर माहिती देणे सोपे होणार असल्याचे सांगितले. या संकेतस्थळावर तालुक्यातील शिक्षकांनी राबवलेले नवोपक्रम, प्रशासनाची माहिती उपलब्ध असून मुख्याध्यापक लॉगिन वरून केंद्रप्रमुखांच्या लॉगिनवर माहिती जाते. केंद्रप्रमुखांनी या माहितीची पडताळणी केल्यावर गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला पाठवता येणार आहे. यामुळे कामकाजात सुटसुटीपणा येणार आहे. तंत्रस्नेही शिक्षक शेखर ठाकूर व संदीप ठोके यांनी वेबसाईटची संरचना करून विकसित केली आहे. www.edupsmalegaon.in हे या वेबसाईटचे संकेतस्थळ आहे. यावेळी विस्तार अधिकारी साहेबराव निकम, आत्माराम अहिरे, नजीर पटेल, केंद्रप्रमुख निंबा निकम, साहेबराव बच्छाव, शिवाजी गुंजाळ, दिलीप जावरे, मोठाभाऊ निकम, शोभा हिरे, सुनंदा पवार उपस्थित होते.