शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘पांजरापोळ’ने वीज बिलाचे थकीत ५४ लाख भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 01:18 IST

विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागून पांजरापोळ संस्थेने ५४ लाख रुपये भरावे, असे आदेश दिले आहेत.

नाशिक : विजेचा वाणिज्य वापर करून साडेतीन लाख रुपये जादा वीज वापराचे भरण्यास नकार देणाऱ्या पांजरापोळ संस्थेने तब्बल २२ वर्षे वीज मंडळाच्या विरोधात न्यायालयीन लढा देऊनही पदरी अपयश पडले असून, जिल्हा न्यायालयात यासंदर्भात सुरू असलेल्या दाव्याचा नुकताच निकाल लागून पांजरापोळ संस्थेने ५४ लाख रुपये भरावे, असे आदेश दिले आहेत.पांजरापोळ संस्थेने १९७५ व ७७ साली वीज मंडळाच्या पंचवटी उपविभागाकडून ३ फेजच्या दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. त्यातील एक चिलिंग प्लॅन्टसाठी व एक शेतीपंपासाठी होती. या दोन्ही जोडण्यासाठी घरगुती वापराचे वीज देयक अदा केले जात असताना वीज मंडळाच्या भरारी पथकाने १९८६ मध्ये अचानक पांजरापोळच्या वीज वापराची तपासणी केली असता, पांजरापोळ संस्थेकडून विजेचा वापर वाणिज्यसाठी केला जात असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे वीज मंडळाने वीज वापराबाबत पांजरापोळ संस्थेला साडेतीन लाख रुपयांचे फरकाचे बिल दिले होते. पांजरापोळ संस्थेने वीज मंडळाच्या या वाढीव बिलाला विरोध दर्शवून थेट न्यायालयात धाव घेतली होती. पांजरापोळ संस्थेत बसविण्यात आलेले वीज मीटर नादुरुस्त असल्याने वीज मंडळाने पांजरापोळचा वीजपुरवठा खंडित करू नये, असा दावा १९९७ मध्ये दाखल केला होता. या दाव्याचा निकाल २००५ मध्ये लागला. त्यात वीज मंडळाची कारवाई योग्य असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला.कनिष्ठ न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पांजरापोळने थेट उच्च न्यायालयात धाव घेऊन स्थगिती मिळविण्यासाठी अपील दाखल केले. परंतु उच्च न्यायालयाने न्यायकक्षाच्या मुद्द्यांच्या आधारे सदरचे अपील जिल्हा न्यायालयाकडे वर्ग केल्यानंतर त्याची सुनावणी जिल्हा न्यायाधीश आर. एम. जोशी यांच्यासमोर झाली. त्यात वीज मंडळाकडून अ‍ॅड. मनोजकुमार हगवणे पाटील यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद केला असता न्यायालयाने सन २००५ मध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निकाल कायम ठेवला.दंडाची रक्कम व्याजासह वसूलतब्बल २२ वर्षांपासून खटला न्यायालयात सुरू असल्यामुळे पांजरापोळ संस्थेकडे थकीत असलेली साडेतीन लाख रुपयांची रक्कम दंड, व्याजासह ५४ लाखांपर्यंत पोहोचली. जिल्हा न्यायालयाचा निकाल वीज मंडळाच्या बाजूने लागल्यानंतर तत्काळ वीज कंपनीचे अधीक्षक अभियंता प्रवीण दलोरी यांनी पांजरापोळ संस्थेला नोटीस पाठवून थकीत ५४ लाख रुपये भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित करण्याचा इशारा दिला. या नोटिसीनंतर संस्थेने तत्काळ ५४ लाख रुपयांचा भरणा केला.

टॅग्स :electricityवीजCourtन्यायालय