शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

दातलवाट परिसरात बिबट्याची दहशत

By admin | Updated: August 30, 2016 00:50 IST

मुसळगाव : बछड्यासह फिरत असल्याने शेतकामे खोळंबली

मुसळगाव : सिन्नर तालुक्यातील मुसळगाव येथील दातलवाट भागात दोन बछड्यांसह बिबट्याचा मुक्त संचार असून, भरदिवसा शेतकऱ्यांना बिबट्या दृष्टीस पडत आहे. त्याच्या दहशतीमुळे शेतात काम करण्यासाठी कोणी धजावत नसल्याने कामे खोळंबल्याचे चित्र आहे.१५ दिवसांपासून येथील दातलवाट भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. मक्याच्या शेतात खत टाकत असताना बबन शिंदे या शेतकऱ्याला बिबट्या दिसला. त्याच्यापासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर बिबट्या झोपला होता. त्यानंतर दोनच दिवसांत बिबट्याने विजय शिंदे यांच्या वासरावर हल्ला करून ठार केले होते. यावर लगेचच वन विभागाने दातलवाट भागात देवनदी पात्राजवळ पिंजरा लावला आहे. पाच-सहा दिवसांपूर्वी रावसाहेब कुऱ्हाडे शेतात काम करत असताना दोन बछड्यांसह बिबट्या दिसून आला. बछड्यांसह वावर असल्यामुळे सदर बिबट्या मादी असल्याचा अंदाज कुऱ्हाडे यांनी व्यक्त केला आहे. बिबट्याने अर्जुन कुऱ्हाडे यांच्या बैलाचाही काही काळ पाठलाग केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. (वार्ताहर)