शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

बर्ड फ्लूच्या भीतीने मका उत्पादकात घबराट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 04:16 IST

गेल्या काही वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ व त्यात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना ...

गेल्या काही वर्षांपासून सतत पडणारा दुष्काळ व त्यात यंदाच्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या टाळेबंदीच्या संकटामुळे आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना यंदा निसर्ग वादळ तसेच वेळोवेळी पडलेल्या समाधानकारक पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. कांद्याचे बाजारभाव निश्चित नसल्याकारणाने यंदा नगदी पीक म्हणून मालेगाव तालुक्यातील शेतकरी मका पिकाकडे वळला होता. इतर पिकांच्या तुलनेत खरीपात मक्याचे पीक गेल्या काही वर्षांपासून चांगले येत असल्याने व उत्पादनाची हमखास खात्री निर्माण झाल्याने अनेक शेतकरी नगदी पीक म्हणून मका लागवडीस पसंती देतात. मात्र मक्यावर पडणाऱ्या लष्करी अळीच्या आक्रमणाने शेतकऱ्यांना महागड्या जंतूनाशक औषधांची फवारणी करावी लागत असल्याने मका पिकासाठी एकरी १५ ते २० हजार रुपये खर्च करावा लागतो. त्यात शेतमजूर मिळात नसल्याने घरच्या मंडळींना राबावे लागते. चार महिने मेहनत घेऊन मक्‍याचे एकरी उत्पादनातून साधारणतः १५ ते २० क्विंटल येते. त्यात मक्याला पुरेसा बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या पदरात फारसे काहीच पडत नाही.

मक्यास महाराष्ट्रासह राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यातील कंपन्यांतर्फे मोठी मागणी असते. त्याचप्रमाणे मलेशिया व तैवान या देशांना मका निर्यात केला जात असतो. स्टार्च कंपन्यांना मोठ्या प्रमाणावर मका लागत असतो. यामुळे वर्षभर मक्याची मागणी असते. मात्र काही राज्यांमध्ये आलेल्या बर्ड फ्लूच्या भीतीमुळे पोल्ट्री व्यवसायासाठी लागणाऱ्या मक्याच्या मागणीत अचानक घट झाली आहे. मका पिकासाठी शासनाने १८ हजार ५०० रुपये आधारभूत किंमत निश्चित केलेली असताना, खासगी व्यापारी मात्र ११०० ते १३०० रुपये प्रति क्विंटल याप्रमाणे मक्याची खरेदी करीत आहेत. त्यामुळे मका उत्पादक शेतकरी हवालदिल झालेला दिसून येत आहे.

कोट...

पोल्ट्री व्यावसायिकांप्रमाणे शासनाने मका उत्पादक शेतकऱ्यांची वेळीच दखल घेऊन, मका पिकास निश्चित केलेल्या आधारभूत किमतीच्या तुलनेत कमी किमतीत विक्री झालेल्या मक्यास प्रति क्विंटल किमान ५०० रुपये नुकसानभरपाई म्हणून अनुदान द्यावे. अन्यथा शेतकरी पुढील वर्षी मका पिकावर बहिष्कार टाकतील.

- अतुल दुकळे, मका उत्पादक, जळगाव निंबायती