शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती सदस्याची गच्छंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:57 IST

शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येणाºया सदस्याने कुठल्याही शासकीय आस्थापनावर राहू नये. तरीही बागलाण तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व एक सरपंचपदी अंगणवाडी सेविका, मदतनीस आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत दोघा पदाधिकाºयांना सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे.

सटाणा : शासन नियमानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांवर निवडून येणाºया सदस्याने कुठल्याही शासकीय आस्थापनावर राहू नये. तरीही बागलाण तालुक्यात एक पंचायत समिती सदस्य व एक सरपंचपदी अंगणवाडी सेविका, मदतनीस आढळून आल्याने गटविकास अधिकाºयांनी त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत दोघा पदाधिकाºयांना सदस्यत्वाचा राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. पठावे दिगर गणाच्या सदस्य केदूबाई राजू सोनवणे यांनी आज सभापती आणि गटविकास अधिकाºयाकडे राजीनामा दिला आहे. या कारवाईमुळे सत्ताधारी गटाला चपराक बसली आहे. तालुक्यात महिला व एकात्मिक बालविकास योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या पदावर अकराशेहून अधिक महिला मानधनावर कार्यरत आहेत. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून बहुतांश सेविका, मदतनीस पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणूक लढवून स्थानिक स्वराज्य संस्थांचादेखील कारभार हाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. शासन नियमाची पायमल्ली करणाºया सेविकांची शोधमोहीम गटविकास अधिकारी जितेंद्र देवरे, महेंद्र कोर यांनी हाती घेतली आहे. पहिल्याच दिवशी दोन कारवाया करण्यात आल्या. त्यात केदूबाई सोनवणे आणि दुसºया कारवाईत बाभुळणे येथील अंगणवाडी सेविकेला सरपंच पदावर पाणी सोडावे लागले आहे. अंगणवाडी सेविका रेखा अहिरे या ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आल्या होत्या.संख्याबळ होणार कमी४चौदा सदस्य असलेल्या बागलाण पंचायत समितीच्या सदस्यत्वाची गच्छंती झालेल्या केदूबाई राजू सोनवणे या दगडी साकोडे येथील रहिवाशी आहेत. त्या गेल्या अनेक वर्षांपासून अंगणवाडी सेविका म्हणून मानधनावर कार्यरत आहेत तर त्यांचे पती कोतवाल म्हणून नोकरीस आहेत. गेल्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या पंचायत समितीच्या निवडणुकीत केदूबाई सोनवणे पठावे दिगर गणातून अपक्ष निवडून आल्या होत्या. निवडून आल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेसला रोखण्यासाठी त्यांनी सत्ताधारी भाजपाला पाठिंबा देऊन सत्तेत सामील झाले. सोनवणे चांगल्याच अडचणीत आल्या असून, त्यांनी मानधन मिळत असलेले सेविका पदावरच राहणे पसंत करत पंचायत समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.