शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

पालखेड, दारणातून सोडले पाणी

By admin | Updated: July 12, 2016 23:43 IST

पालखेड, दारणातून सोडले पाणी

नाशिक : गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नाशिक परिसरात काहीशी विश्रांती घेतली असली तरी, पेठ व दिंडोरी या दोन तालुक्यांत दिवसभर सुरू असलेल्या पावसामुळे पालखेड धरण ओव्हरफ्लो होऊन परिणामी कादवा नदीला पूर आला आहे. दरम्यान, दारणा व पालखेड धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे नांदूरमधमेश्वरमधून दिवसभर ३० हजार क्यूसेक इतक्या वेगाने पाणी सोडण्यात आले. नाशिक जिल्ह्यात मंगळवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ४७६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यात त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी, सुरगाणा व नाशिक या ठिकाणी पावसाचे प्रमाण सकाळपर्यंत कायम होते. नाशिक शहरात दुपारपर्यंत पावसाने आपली हजेरी कायम ठेवली त्यानंतर मात्र उघडीप दिली. परंतु ग्रामीण भागात नाशिक वगळता जोर कायम होता. दिंडोरी तालुक्यात पालखेड धरणाच्या वरच्या बाजूला जोरदार पाऊस सुरू असल्याने साधारणत: एका तासाला पालखेड धरणात दीडशे दशलक्ष घनफूट इतक्या पाण्याची भर पडू लागल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला. सायंकाळी चार वाजता पुन्हा धरणातून पाणी सोडण्यात आले. याचवेळी मासेमारीसाठी पालखेड धरणाच्या खालच्या बाजूला गेलेले सहा मच्छीमार पुरात सापडले. त्यांच्या बचावासाठी प्रशासनाने धावपळ केली. याच पाण्यामुळे कादवा नदीला पूर आल्याने निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गो शाळेसमोर कादवा नदीत तीन ग्रामस्थ अडकल्याने त्यांनाही सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न करण्यात आले. इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर कायम असल्यामुळे दारणा धरण ६७ टक्के भरले असून, दारणातून नऊ हजार क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे. नऊ तासांत २७६ मिलिमीटरजिल्ह्णातील ग्रामीण भागात पावसाचा जोर कायम असून, मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत २७६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. त्यात नाशिक- ११, इगतपुरी- ३३, त्र्यंबकेश्वर- ३३, दिंडोरी- ४७, पेठ- ९८, निफाड- ३, बागलाण- ६, कळवण- १०, सुरगाणा- ३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे.