शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

चित्रकार सावंत बंधुंनी चीनमध्ये फडकविला तिरंगा

By admin | Updated: December 22, 2014 01:11 IST

दहा लाखांचे इनाम : आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात चीन सरकारकडून झाला गौरव, पोस्टकार्डवरही बहुमान

नाशिक : आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या चित्रशैलीने गौरविलेले नाशिकचे चित्रकार राजेश आणि प्रफुल्ल सावंत या बंधुंनी चीनमध्ये चिन्ताव येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रप्रदर्शनातही भारताचा तिरंगा फडकविला असून, नाशिकच्या नावलौकिकात भर घातली आहे. सावंत बंधुंना प्रत्येकी पाच लाख रुपयांचे इनाम समारंभपूर्वक देण्यात आले याशिवाय चीन सरकारच्या पोस्टकार्डावरही सावंत बंधुंची चित्रे प्रदर्शित करत त्यांचा सन्मान केला आहे.चीनमध्ये चिन्ताव याठिकाणी आंतराष्ट्रीय चित्रप्रदर्शन सुरू असून, प्रदर्शनात सहभागी झालेले नाशिकचे चित्रकार राजेश सावंत यांच्या ‘गोल्डन जर्नी’ या चित्रास चिन्ताव आर्ट म्युझियमचे चेअरमन गॉँग माओ यांच्या हस्ते, तर चित्रकार प्रफुल्ल सावंत यांच्या ‘नारोशंकर टेम्पल अ‍ॅट मॉर्निंग’ या जलरंगातील चित्राला म्युझियमचे संचालक झ्यू डो यांच्या हस्ते प्रत्येकी पाच लाख रुपये व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. सावंत बंधुंना या चित्रप्रदर्शनासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले होते. सावंत बंधुंची चित्रे म्युझियममध्ये कायमस्वरूपी संशोधन व अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याशिवाय चीन सरकारने सावंत बंधुंची चित्रे पोस्टकार्डावरही मुद्रित करून भारताचा बहुमान केला आहे. नाशिकचे ज्येष्ठ चित्रकार भि. रा. सावंत यांचे सुपुत्र असलेल्या राजेश व प्रफुल्ल सावंत यांना चायना सरकारकडून प्रथमच प्रतिष्ठेच्या पारितोषिकाने गौरविण्यात आले आहे. सदर चित्रप्रदर्शन चीनमध्ये २८ फेबु्रवारी २०१५ पर्यंत सुरू राहणार असून, जगातील सर्वोत्कृष्ट २० जलरंग चित्रकारांमध्ये सावंत बंधुंचा समावेश झाला आहे. (प्रतिनिधी)