शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

पावसाच्या माहेरघरीच पाण्यासाठी पायपीट

By admin | Updated: June 8, 2016 22:35 IST

पाणीटंचाई : वास्तव्य इगतपुरी तालुक्यात, पाण्यासाठी शहापूर तालुक्यात

 घोटी : जिल्ह्याच्या प्रवेशद्वारावर व नाशिक आणि ठाणे जिल्ह्याच्या हद्दीवर असलेल्या इगतपुरी तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांना पाणीटंचाईची भीषण झळ बसत असल्याने महिलांना हंडाभर पाणी मिळविण्यासाठी दऱ्याखोऱ्यातून पायपीट करीत चक्क ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातून पाणी आणावे लागत असल्याचे विदारक चित्र पाहण्यास मिळत आहे. या वाड्यांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी टॅँकरने पाणीपुरवठा करण्याचा शासनाने केविलवाणा प्रयत्न केला; मात्र हे टॅँकर रस्त्याअभावी या वाड्यांपर्यंत पोहोचत नसल्याने पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.प्रचंड पर्जन्यवृष्टी असलेल्या इगतपुरीसारख्या आदिवासी तालुक्यात हंडाभर पाण्यासाठी महिलांना तीन ते चार किलोमीटर अवघड व खडतर वळणांच्या डोंगरदऱ्यांतून पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र पाहावयास मिळत आहे. शासनाची सर्वव्यापक उदासीनता याला जबाबदार असल्याच्या प्रतिक्रि या ग्रामस्थ देत आहे.इगतपुरी शहराजवळून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आवळखेड हे १०० टक्के आदिवासी गाव आहे. या गावाच्या परिसरात काराची वाडी, जांभूळवाडी, वारेवाडी, चांदवाडी व वानरवाडी या आदिवासी बांधवांच्या छोट्या वाड्या आहेत. अतिशय निसर्गरम्य आणि डोंगरदऱ्यांनी व्यापलेल्या या परिसरात पावसाळ्यात दरवर्षी सरासरी जवळपास ३००० ते ३५०० मि.मी. एवढा प्रचंड पाऊस पडतो. मात्र पाणी येते आणि जाते. एवढा पाऊस होऊनदेखील या आदिवासी बांधवाना सध्या पिण्यालादेखील पाणी नसल्याचे भयानक वास्तव डोळ्यादेखत दिसत आहे. या वाड्यांच्या परिसरात तीन विहिरी आहेत. त्यात एका विहिरीत अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त पाणी असल्यामुळे तिचा वापर होत नाही. एक विहीर शासनाची, तर एक खासगी आहे. एक गाव आणि सहा वाड्यांची तहान भागवण्यासाठी शासनामार्फत एक टॅँकर सुरू आहे. ते कधी येते त्याचे वेळापत्रक या महिलांना माहीत नाही. टॅँकर आल्यावर ते पाणी जवळपास शासनाच्या ७० फूट खोल विहिरीत टाकले जात आहे. त्यानंतर अतिशय तळाला असलेल्या या विहिरीतून पोहऱ्याने पाणी काढण्याचा आणि हे पाणी घरापर्यंत नेण्याची महिला, पुरुष व लहान मुलांची होणारी कसरत हा एक थरारक अनुभव आहे.सकाळपासून ते सायंकाळपर्यंत घरासाठी पाणी वाहून नेणे हाच या आदिवासी महिलांच्या दिनचर्येचा भाग बनला आहे. विशेष म्हणजे, महिलांच्या मदतीसाठी शाळा व नोकरी करून पुरुष व लहान मुलांनादेखील धावपळ करावी लागत आहे. हीच अवस्था कसारा घाटात असणाऱ्या चिंचले व खैरे या गावाची आहे. या गावांतील महिलांनाही पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी लगतच्या शहापूर तालुक्यात जावे लागत आहे.