शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय जुमला पक्षाचे ‘गाजर’ शेतीला पॅकेज

By admin | Updated: February 14, 2017 01:08 IST

आदित्य ठाकरे यांची भाजपावर टीका

नाशिक : निवडणुकीचा माहोल सुरू झाल्याने भारतीय जुमला पक्षाकडून ‘गाजर’ शेतीला प्राधान्याने पॅकेज देण्याच्या घोषणा होऊ लागल्या आहेत. परंतु ज्या ज्या ठिकाणी या जुमला पक्षाने पॅकेज दिले, तेथे तेथे हा पक्ष तोंडघशी पडला आहे, अशी टीका युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी भाजपाचे नाव न घेता केली आहे. सिडको येथील पवननगर येथे सिडको विभागातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. आपल्या भाषणात ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेवरही टीकेची झोड उठविली. ते म्हणाले, निवडणुकीच्या तोंडावर एका पक्षाने नाशिक शहरभर विकासकामे केल्याची फलकबाजी केली आहे. जर त्यांनी खरोखरच विकासाची कामे केली असती तर इतक्या मोठ्या प्रमाणात या पक्षाला गळती कशी लागली, असा सवाल करून त्यांनी इतिहासात पहिल्यांदाच असे झाले आहे की, सत्तेतील नगरसेवकांनी पक्ष सोडून विरोधी पक्षात प्रवेश केला आहे.  शिवसेनेचा जाहीरनामा नसून वचननामा आहे. वचन म्हणजे जे तुम्हाला दिले ते पूर्ण करणार, असे सांगून ठाकरे यांनी मुंबई व औरंगाबाद महापालिकेत आजवर केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडला. नाशिक वाचवायचे असेल तर ‘जुमला’ पक्षाच्या भूलथापांना बळी पडू नका, असे आवाहन करून आदित्य ठाकरे यांनी मनपात शिवसेनेची सत्ता आल्यास सिडकोवासीयांच्या जिव्हाळ्याच्या पेलिकन पार्कचे काम अवघ्या सहा महिन्यांत सुरू केले जाईल, असे सांगितले. काही पक्षांनी निवडणुकीचे जाहीरनामे स्टॅम्प पेपरवर केले आहेत. नवीन नोटांचा रंग ज्या पद्धतीने नोटा घासल्यावर जातो, तसेच या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या घोषणांचाही रंग जाईल, हे लक्षात घेऊन नाशिककरांनी केंद्रातील सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधातील राग मोठ्याने आळवावा जेणेकरून दिल्लीपर्यंत त्याचा आवाज पोहोचेल व त्यांचा मनमानी कारभार थांबेल, असेही ते म्हणाले.  यावेळी बोलताना पक्ष प्रवक्ता आदेश बांदेकर यांनी पारदर्शकता म्हणजे काय, असा सवाल करून जे स्पष्ट व स्वच्छपणे दिसते ते पारदर्शी आहे किंवा काचेतूनही जे दिसते ते पारदर्शी असेल तर अशा पारदर्शी कारभारासाठी शिवसेना हेच एकमेव नाव असल्याचा दावा केला. यावेळी खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सुधाकर बडगुजर यांची भाषणे झाले. व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड व शहर महिला आघाडी प्रमुख श्यामला दीक्षित यांच्यासह सिडकोतील सेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते. (प्रतिनिधी)गाजर विकत घेऊ नका, फुकटात मिळतीलनाशिक महापालिकेतील भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ येत्या १८ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार असल्याचा संदर्भ देत आदित्य ठाकरे यांनी या सभेच्या दिवशी नाशिककरांनी गाजर खरेदी करू नयेत, ते त्यांना मोफत वाटप केले जातील, असे सांगून टीका केली.