शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ओझरखेड कालव्याला सोडले रबीचे आवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:20 IST

शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.

ठळक मुद्देपाटबंधारे विभाग : दुरुपयोग न करण्याचे आवाहन

शिरवाडे वणी : ओझरखेड कालव्याला रबी हंगामातील पिके घेण्यासाठी तसेच पिण्याच्या पाण्याचा आरक्षित साठा असल्यामुळे गावतळे भरण्यासाठी सोडण्यात आले असून पाण्याचा लाभ घेण्यापासून कोणीही वंचित राहू नये, तसेच पाण्याचा दुरुपयोगसुद्धा करू नये, असे आवाहन पाटबंधारे विभागाने तसेच पाणी वापर संस्थेच्या वतीने केले आहे.          येथील परिसराला लागून असलेल्या रबी हंगामातील पिके घेण्यासाठी या वर्षातील नुकतेच पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. मागील महिन्यात बहुतांशी भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली; परंतु त्याचा दुरुपयोग झाला असून रबी हंगामातील गहू, हरभरा, मका, उन्हाळी कांदे, जनावरांसाठी चारा व इतर भाजीपाला वर्गीय पिके घेण्यासाठी पाणी देणे गरजेचे असते.              ओझरखेड कालव्याच्या कार्यक्षेत्रात येत असलेल्या जमिनीपैकी बहुतांशी जमीन डोंगर भागातील ओबड-धोबड व वरकस स्वरूपाचे आहे. त्यामुळे या भागात पडणारा पाऊस भौगोलिक रचनेमुळे लगेच वाहून जातो. तसेच अनियमित पाऊस झाला तर दुबार, तिबार पेरणीच्या संकटांना सामोरे जावे लागते. तेथील जमीन बहुतांशी भागात मुरमाड व हलक्‍या-मध्यम स्वरूपाची असल्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होण्यास वेळ लागत नाही.              काही ठराविक भागात पाणीटंचाईसुद्धा तितकीच भासली होती व उन्हाळ्याची चाहूल लागल्यामुळे उन्हाच्या तीव्र माऱ्यामुळे पिकांना पाण्याची गरज मोठ्या प्रमाणावर भासत असते. परिसरातील रानवड, सावरगाव, नांदू शिरवाडे, मुखेड, वावी, नांदूर, गोरठाण गावातील परिसर व परिसरातील पाणीपुरवठा योजना या ओझरखेड कालव्याला येणाऱ्या पाण्यावरच अवलंबून असतात या गावातील पाणी वापर संस्थांचा व मागणीनुसार विभागाने बैठकीअंतर्गत पाण्याचे नियोजन केले जाते त्यामुळे या वर्षाच्या मागणीनुसार पाटबंधारे विभागामार्फत पाणी सोडण्यात आले आहे.वर्षातील पहिले आवर्तनया वर्षातील पहिले आवर्तन सोडण्यात आले असून पाण्याचा योग्य वापर शेतकरीवर्गाने करावा. पाणी घेण्यासाठी कोणीही शेतकरीवर्गाने वंचित राहू नये. तसेच गाव तळे नदीवरील बंधारे भरून घेण्यासाठी योग्य ते सहकार्य करण्यात यावे. सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे या गावांतील परिसराला पाणीटंचाई तीव्रता कमी होण्यास मदत होणार आहे.

टॅग्स :water transportजलवाहतूकagricultureशेती