शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली.

By admin | Updated: January 5, 2015 01:48 IST

कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली.

नाशिक : ‘काहीही न बोलता काम करीत राहिलो. कशाचीच अपेक्षा केली नाही. कार्यमग्नतेतूनच अडचणींवर मात केली. त्यातूनच भक्कमपण आले... साधे-सोपे राहिलो, तरी आपल्या आयुष्यावर चित्रपट निघाला, समाजाकडून भरभरून प्रेम मिळते आहे... आणखी काय हवे?’- अशी कृतार्थ भावना ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश व डॉ. मंदाताई आमटे यांनी व्यक्त केली. इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) व समकालीन प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. आमटे दाम्पत्याशी मुक्त संवादाचा कार्यक्रम कर्मवीर रावसाहेब थोरात सभागृहात झाला, त्यावेळी या दोन्ही सेवाव्रतींनी अनेक विषयांवर मनमोकळी मते मांडली. डॉ. शशांक कुलकर्णी व डॉ. नीरजा कणीकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. बाबा आमटे यांचे संस्कार, हेमलकसा प्रकल्प, तेथील सोयी-सुविधा, मुलांचे विवाह, आदिवासींची जीवनपद्धती, समाजाचा दृष्टिकोन अशा अनेक विषयांना मुलाखतीतून स्पर्श करण्यात आला. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले की, सुरुवातीच्या काळात आदिवासींचे दु:ख जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर फुललेला आनंद हीच कामाची ऊर्जा होती. आदिवासींचा आमच्यावर विश्वास बसत नव्हता; पण त्या काळाला ‘खडतर’ म्हणणे चुकीचे ठरेल. कारण ते सारे आम्ही स्वत:हून स्वीकारले होते. दोघांनी मिळून निर्णय घेतले. सुख-दु:खे ‘शेअर’ करू शकत नव्हतो. त्यामुळे संयम शिकलो. आता आमची तिसरी पिढी आदिवासींसाठी झोकून देऊन काम करीत आहे. हेमलकसा प्रकल्पाच्या शाळेतील मुले डॉक्टर, इंजिनिअर होऊ लागली आहेत. तेथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. यात आम्ही निमित्तमात्र असून, समाजाच्या पाठिंब्यामुळेच हे होऊ शकले. डॉ. मंदाताई यांनी सांगितले की, प्रारंभी लोकांचा आमच्यावर विश्वास बसत नसल्याने नैराश्य यायचे. कोणी बोलायलाच नसल्याने आमचे एकमेकांशी चांगले ‘ट्यूनिंग’ जमले. आदिवासींची भाषा शिकलो. कामात वेळ घालवल्याने जीवन कंटाळवाणे झाले नाही. आदिवासींचे स्त्रीजीवन, तेथील विवाहाच्या प्रथा-परंपरा यावरही त्यांनी प्रकाश टाकला. सुमारे दीड तास हा कार्यक्रम सुरू होता. समकालीन प्रकाशनाचे आनंद अवधानी यांनी प्रास्ताविक केले. आमटे यांच्यातील डॉक्टर समजावून घेण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केल्याचे ते म्हणाले. डॉ. मंगेश थेटे यांनी सूत्रसंचालन केले. ज्येष्ठ नेते विनायकदादा पाटील, मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, आमदार तथा ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. राहुल अहेर यांच्या हस्ते आमटे दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. डॉ. सुहास कुलकर्णी, मुक्ता चैतन्य, डॉ. अनिरुद्ध भांडारकर, डॉ. आवेश पलोड आदि व्यासपीठावर उपस्थित होते.