शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

अनाथालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By admin | Updated: September 15, 2016 00:17 IST

अनाथालयातील विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

त्र्यंबकेश्वर : तुपादेवी फाट्यावरील ओम त्र्यंबकराज अनाथ बालगृहातील विद्यार्थी दत्तात्रय बाळासाहेब विगे (९ वर्षे) हा बुधवारी दुपारच्या सुटीत अंघोळीसाठी प्रयागतीर्थावर गेला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. त्र्यंबकपासून ३ कि.मी. अंतरावरील अनाथाश्रमातील सुमारे १७ मुले त्र्यंबकेश्वरच्या जि. प. शाळेत शिक्षणासाठी येत असतात. या सर्व विद्यार्थ्यांना दुपारच्या सुटीत शाळेतच बालकल्याण विभागामार्फत जेवण असते. तथापि, त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थापासून २ कि.मी. अंतरावर ओम वाहेगुरू या नावाचा गुरुद्वारा असून, तेथे अनाथाश्रमातील विद्यार्थी दुपारच्या सुटीत जेवणासाठी रोज लंगरमध्ये जातात. दत्तात्रय मित्रांसमवेत जेवण झाल्यावर अंघोळीसाठी गेल्याचे सांगितले जाते. त्याला जेव्हा बुडताना कपडे धुणाऱ्या महिलांनी पाहिले, तेव्हा त्यांनी आरडाओरडा केला. तेव्हा तेथील विक्रम कोठुळे नामक युवकाने १०८ नंबरला फोन केला. तथापि ही रुग्णवाहिका उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे विक्रम याने आपल्या दुचाकीवरून त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तथापि, तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी वासनिक यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यासंदर्भात त्र्यंबकेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात जि. प. सदस्य संपतराव सकाळे यांनी भेट देऊन कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही, याबाबत सखोल चौकशी करावी, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. गटविकास अधिकारी एम. बी. मुरकुटे म्हणाले, आज तब्बल १६ विद्यार्थी दुपारनंतर गैरहजर असल्याचे दिसून आले. हे हजेरीपुस्तक संशयास्पद असल्याने याबाबत पूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करू, असे सांगितले.त्यांच्या समवेत पती फकिरराव अहिरराव व दोघे मुले उपस्थित होते. पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख, हवालदार संजय खैरनार, हवा. रमेश पाटील, जाधव, काकड आदिंनी इन्क्वेस्ट पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक येथे पाठविला. या मयत मुलाला फक्त आजी असून, अद्यापपावेतो ती नांदगाव येथून आलेली नव्हती. (वार्ताहर)