शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग प्राधिकरणाला वृक्षलागवडीचे आदेश

By admin | Updated: May 15, 2014 22:02 IST

नाशिक : वडपे ते गोंदे म्हणजे ठाणे, नाशिक ते धुळ्यापर्यंत राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण.

नाशिक : वडपे ते गोंदे म्हणजे ठाणे, नाशिक ते धुळ्यापर्यंत राष्टÑीय महामार्गाचे चौपदरीकरण करताना हजारो झाडांची कत्तल करणार्‍या राष्टÑीय महामार्ग प्राधिकरणाला एका वृक्षतोडीच्या बदल्यात तीन झाडे याप्रमाणे लागवड करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. निवृत्त वनअधिकार्‍यांच्या देखरेखीखाली ही वृक्षलागवड करायची असून, या अधिकार्‍यांनी ३० सप्टेंबरपर्यंत उच्च न्यायालयात अहवाल सादर करावा, असेही न्यायालयाने म्हटले आहे. वडपे ते गोंदेदरम्यान राष्टÑीय महामार्गाच्या वतीने रुंदीकरण करताना हजारो झाडे तुटणार असल्याने नाशिक कृती समितीच्या वतीने अश्विनी भट, आनंद देशपांडे आणि ऋषिकेश नाझरे यांनी उच्च न्यायालयात २००६ मध्ये याचिका दाखल केली आहे. सध्या खटल्याचा पाठपुरावा ‘हिरवा वणवा’चे संचालक राजन दातार करीत आहेत. या याचिकेसंदर्भात न्यायालयाने नुकतेच महत्त्वाचे आदेश दिले असून, महामार्ग विभागाला वृक्षलागवडीसाठी आदेश देताना साडेचार कोटी रुपयांची बॅँक गॅरंटी देण्याचे आदेश दिले आहेत. वृक्षलागवडीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने व्हावे, यासाठी वनखात्याचे अधिकारी नियुक्त करण्याची विनंती याचिकाकर्त्यांनी केली होती. त्यानुसार निवृत्त सहायक वनसंरक्षक बी. पी. पवार आणि एस. डी. नारनवार यांची नियुक्ती न्यायमूर्ती ए. ए. सय्यद आणि ए. एस. ओका यांच्या खंडपीठाने केली आहे. धुळे जिल्ह्यासाठी पी. एस. पाटील तर ठाणे जिल्ह्यासाठी वनखात्याने नाव सुचविल्यावर त्यांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान, महामार्ग महापालिकेच्या हद्दीतून जात असल्याने त्यासंदर्भातही न्यायालयाने महापालिकेसदेखील वृक्षलागवड होते किंवा नाही हे बघतानाच शहरात न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय वृक्षतोड करण्यास मनाई केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत वृक्षांची छाटणी आणि तोडीबाबत न्यायालयाने निर्णय घ्यावा, असे आदेशदेखील न्यायालयाने दिले आहेत. यासंदर्भात पुढील सुनावणी आॅक्टोबर महिन्यात होणार आहे. (प्रतिनिधी)