शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ बालकांचा तत्काळ सर्व्हे करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:17 IST

महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. या सभेत एप्रिल २०२१ अखेर वार्षिक ...

महिला व बाल कल्याण समितीची सभा सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाइन झाली. या सभेत एप्रिल २०२१ अखेर वार्षिक कुपोषित बालकांचा आढावा घेण्यात आला. त्यात नाशिक जिल्ह्यात मध्यम कुपोषित बालके २२८८ व तीव्र गंभीर कुपोषित बालके ३४९ असल्याचे सांगण्यात आले. १५ वा वित्त आयोग निधीमधून अंगणवाडी बालकांचे कुपोषण कमी करण्यासाठी १० टक्के निधी खर्च करण्याचे शासनाचे आदेश असल्याने सदर निधीमधून कुपोषणावर सर्व ग्राम पंचायती खर्च करतात किंवा नाही, याबाबत सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी आढावा घ्यावा, अशा सूचना सभापती आहेर यांनी केल्या. त्याचबरोबर कोविडमुळे पालकांचा मृत्यू झाला, अशा अनाथ बालकांचा तत्काळ सर्व्हे करण्यात यावा. शासनाने सदर अनाथ बालकांचे पालकत्व स्वीकारण्याचे धोरण जाहीर केलेले आहे. ग्रामीण भागात अनाथ बालकांचे तत्काळ सर्वेक्षण करून माहिती सादर करावी, तसेच कोणतेही बालक लाभापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. नाशिक जिल्ह्यात जी बालके अनाथ झालेली आहेत, अशा बालकांची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांना सादर करण्याचे आवाहन देखील सभापती यांनी केले आहे.

नाशिक जिल्ह्यात २२८ अंगणवाडी सेविका ८३९ अंगणवाडी मदतनीस व ८५ मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी देखील दिलेली आहे. मात्र, कोविड संसर्गामुळे सदर भरती प्रक्रिया झालेली नाही. सद्यस्थितीत कोविड रुग्णांचे प्रमाण कमी होत असून, अंगणवाडी सेविकांच्या रिक्त पदांमुळे ग्रामीण भागातील लाभार्थींना पोषण आहार वाटप करताना अडचणी येत असल्याने अंगणवाडी सेविका-मदतनीस भरती प्रक्रिया माहे जून-जुलैमध्ये प्राधान्याने करण्यात यावी, अशा सूचनाही सभापती अश्विनी आहेर यांनी सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना दिल्या. भरती प्रक्रियेसंबंधी सर्व माहिती जिल्हा परिषद पदाधिकारी व जिल्हा परिषद यांना देण्याबाबत सूचना दिल्या. (फोटो ०७ अश्वीनी)