शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

मतदार नोंदणीची १४ आॅक्टोबरपर्यंत संधी

By admin | Updated: September 16, 2016 23:44 IST

राजकीय पक्षांना आवाहन : निवडणुकीसाठी यादी ग्राह्य

नाशिक : आगामी महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची इच्छुकांनी एकीकडे तयारी चालविली असताना दुसरीकडे निवडणूक आयोगानेही या निवडणुकीतील मतदानापासून मतदार वंचित राहू नयेत यासाठी मतदार यादीचे पुनरीक्षण करण्याचा निर्णय घेऊन १४ आॅक्टोबरपर्यंत नवीन मतदार नोंदविण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. हीच यादी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. या संदर्भात आज निवडणूक अधिकाऱ्यांनी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मतदार यादी पुनर्रिक्षण कार्यक्रमांची माहिती देऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले. शुक्रवार दि. १६ सप्टेंबर ते १४ आॅक्टोबर या दरम्यान नवीन मतदारांची नोंदणी होऊ शकते त्याच बरोबर नाव, पत्त्यात बदल, लिंग बदल, मतदारसंघ, केंद्रात बदल यासारखे मतदार यादीतील बदलही मतदारांना करून घेण्याची संधी आहे. या मोहिमेसाठी १८ सप्टेंबर व ९ आॅक्टोबर रोजी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, त्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना मतदार याद्या पाहता येतील व नाव नोंदणी, मतदार यादीतील तत्सम बदल करू शकतील. त्यानंतर मतदारांच्या हरकती व दाव्यांची सुनावणी घेण्यात येऊन ५ जानेवारी २०१७ रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात येणार आहे. या मोहिमेत १ जानेवारी २०१७ रोजी जे वयाची अठरा वर्षे पूर्ण करू शकतील त्यांनाही सहभागी होता येणार असून, ते नव मतदार म्हणून नाव नोंदवू शकतील. या मोहिमेत अधिकाधिक मतदारांना सहभागी करून घेण्याच्या दृष्टीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या राजकीय पक्षांच्या बैठकीत या मोहिमेची माहिती देण्यात आली. त्यावेळी अनेकांनी बोगस मतदारांचा प्रश्न उपस्थित करून घरोघरी जाऊन मतदारांची तपासणी केली जावी, अशी मागणी केली. तसेच शाळांमध्ये नेमलेल्या शिक्षक, मुख्याध्यापकांना या मोहिमेविषयी काहीच माहिती नसते परिणामी मतदारांचा भ्रमनिरास होतो अशी तक्रार करण्यात आली. बीएलओंचे कार्य व अधिकार काय याचीही माहिती विचारण्यात आली. यावेळी भाजपाचे गिरीश पालवे, अरुण शेंदूर्णीकर, शिवसेनेचे रवींद्र जाधव, बसपाचे अरुण काळे, उपजिल्हाधिकारी शशिकांत मंगरूळे, तहसीलदार गणेश राठोड उपस्थित होते.