शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

मनाची कवाडे उघडा, साचेबद्धतेतून बाहेर पडा

By admin | Updated: October 18, 2015 23:47 IST

विद्यागौरी टिळक : जिल्हा साहित्यिक मेळाव्यातील अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन

नाशिक : ‘स्मृतिचित्रे’कार लक्ष्मीबाई टिळक यांनी मनाची कवाडे उघडत पूर्वग्रहदूषित, परंपरागत गोष्टींना छेद दिला. जाती या माणसाने तयार केल्या असल्याचे लक्षात घेत त्यांनी माणूसपण महत्त्वाचे मानले. सध्यादेखील समाज ठराविक कप्प्यांत अडकत चालला असून, त्याने लक्ष्मीबार्इंना समोर ठेवून या साचेबद्धतेतून बाहेर पडणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा साहित्यिक मेळाव्याच्या अध्यक्ष प्रा. डॉ. विद्यागौरी टिळक यांनी केले. सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आयोजित ४८व्या जिल्हा साहित्यिक मेळाव्यात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्या बोलत होत्या. ग्रंथालयभूषण मु. शं. औरंगाबादकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ लेखिका मीना प्रभू, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कार्यवाह मिलिंद जहागिरदार, उपाध्यक्ष नरेश महाजन, वासुदेव दशपुत्रे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रा. डॉ. टिळक यांनी भाषणातून आपल्या पणजी लक्ष्मीबाई टिळक यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. त्या म्हणाल्या, लक्ष्मीबार्इंकडे तटस्थतेने पाहताना व त्यांचे ‘स्मृतिचित्रे’ वाचताना अनेक नव्या गोष्टी लक्षात आल्या. त्यांच्या आयुष्यातील सर्वच गोष्टींना ना. वा. टिळक जबाबदार नव्हते. लक्ष्मीबार्इंकडे स्वतंत्र विचार करण्याची बुद्धी होती. त्यांनी अनेक अंधश्रद्धा साफ धुडकावल्या. प्रा. डॉ. टिळक यांनी लक्ष्मीबार्इंच्या आयुष्यातील अनेक प्रसंंगांचे दाखले देत त्यांचे पुरोगामित्व पटवून दिले. लक्ष्मीबार्इंना अनेकांनी हट्टी म्हटले आहे; पण तसे होण्याची वेळ त्यांच्यावर का आली, याचाही विचार व्हावा. प्रारंभी पतीच्या ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याला कडाडून विरोध करणाऱ्या लक्ष्मीबार्इंनी नंतर मनमोकळे धोरण अवलंबले. माणूस असणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे मानत त्यांनी मनाची कवाडे उघडून स्वत:ला तपासण्याची संधी घेतली. ओळखही नसलेल्या रुग्णांची सेवा करणे, अगदी प्रेते उचलायलाही पदर खोचून उभे राहणे, यातून हेच दिसून येते. आपल्याकडच्या शुचिर्भूततेच्या, भेदाच्या कल्पनांतून त्या बाहेर पडल्या आणि मनाला योग्य वाटेल तेच केले, हे आजच्या काळातही अत्यंत महत्त्वाचे आहे, असेही त्या म्हणाल्या. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. वर्षभरात दिवंगत झालेल्या व्यक्तींना आदरांजली अर्पण करण्यात आली. किशोर पाठक यांनी प्रास्ताविक केले. प्रशांत केंदळे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)