शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

निवृत्तिनाथांच्या पालखीसोबत ४० वारकऱ्यांनाच परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST

दरवर्षी संत निवृत्तिनाथ पायी दिंडी सोहळ्यात जवळपास २५ दिंड्या सहभागी होतात. त्यामुळे यावेळी त्या प्रत्येक दिंडीचा प्रतिनिधी म्हणून ...

दरवर्षी संत निवृत्तिनाथ पायी दिंडी सोहळ्यात जवळपास २५ दिंड्या सहभागी होतात. त्यामुळे यावेळी त्या प्रत्येक दिंडीचा प्रतिनिधी म्हणून एक असे २५ वारकरी सहभागी होतील. तर दोन दिंडी मानकरी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज डावरे, ह.भ.प.मोहन महाराज बेलापूरकर, देवस्थानचे पुजारी, किमान चार प्रशासकीय सदस्य, विणेकरी, झेंडेकरी, टाळकरी, पखवाज वादक, संस्थानचे दोन कर्मचारी आदी देवाच्या लवाजम्यासह या शिवशाहीत असणार आहेत. दरम्यान या वेळी माजी विश्वस्तांना पालखी सोहळ्यात प्रवेश देऊ नये असे आवाहन एका संघटनेने केले आहे. तसे दिल्यास तर बस समोर आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. मागील वर्षी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरून सकाळी १० वाजता बसमधून पालखीचे प्रस्थान करण्यात आले होते. यावर्षी दोन्ही बस पहाटे पाच वाजताच त्र्यंबकेश्वर येथून रवाना होणार आहेत. याबाबत पुजारी जयंत महाराज गोसावी यांनी सांगितले, बस दुपारी ३ वाजता पोहोचेल अशा बेताने निघावे लागणार आहे. वाखरीपर्यंतच बस थांबणार आहे. तेथून पायी दिंडीने पंढरपुरात पोहचायचे आहे. त्यामुळे पहाटे पाच वाजताच निघावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.