शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

कांद्याचे भाव घसरले

By admin | Updated: May 12, 2017 01:26 IST

येवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत निरंतर वाढच होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कयेवला : येवला व अंदरसूल उपबाजार समितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत निरंतर वाढच होत आहे. यंदा भाव निम्म्याने घसरल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. गुरुवारी येवला व अंदरसूल कांदा बाजार आवारात किमान १०० ते कमाल ४६० रु पये प्रतिक्विंटल असले तरी सरासरी ३२५ रु पये कांदा विकला गेला. शेतकऱ्यांना ‘बुरे दिन’ आल्याची प्रतिक्रिया बळीराजाने बाजार समितीच्या आवारात गुरु वारी व्यक्त केली. कर्जमाफी तर नाहीच शिवाय शासन आणि जिल्हा बँकेने चालवलेली सक्तीची कर्जवसुली, कांद्याचे निरंतर घसरत असलेले भाव या दुहेरी कात्रीत शेतकरी सापडला आहे.येवला व अंदरसूल उपबाजार समितीत दररोज ७० ते ८० हजार क्विंटल आवक होत आहे. कांदा भावात घसरण होत असल्याचे चित्र आहे. शासन कांद्याबाबत कधी गंभीर होणार, हाच प्रश्न शेतकरी विचारू लागले आहेत. सत्ता मिळाल्यावर उत्तर प्रदेशात कर्जमाफी झाली. महाराष्ट्रात सत्ता आहे पण कर्जमुक्ती नाही. या दुटप्पी धोरणाचा निषेध करून आधी कांद्याला भाव द्या आणि संपूर्ण कर्जमुक्ती करा, अशी मागणी येवला तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.जानेवारी २०१६ मध्ये २ लाख ९० हजार ९५० क्विंटल आवक होऊन १०५० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. यंदा दि. २० जानेवारी २०१७ पर्यंत ४ लाख ७१ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून, केवळ ५२५ रु पये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. तरीही शेतकरी सहन करीत होता. परंतु कांदा भावात निरंतर होणारी घसरण थांबलीच नाही. मे महिन्याच्या प्रारंभी कांदा तब्बल २५० रु पये प्रतिक्विंटलची घसरण पाहून सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.