शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कांदा गोणी लिलाव प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By admin | Updated: July 29, 2016 01:33 IST

कांदा गोणी लिलाव प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

नाशिक : बाजार समिती नियमनमुक्ती कायद्यात दुरुस्ती करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे गुरुवारची बैठक कोणत्याही ठोस निर्णयाविना झाली.बाजार समिती नियमनमुक्त करण्याच्या अध्यादेशात सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने २० जणांची समिती नियुक्त केली. या समितीची बैठक गुरुवारी ५ वाजता पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झाली. या समितीने सुचविलेल्या शिफारशीनुसार बाजार समिती नियमनमुक्ती अध्यादेशात सुधारणा करण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. मात्र बैठकीत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार असल्याने त्यांना या समितीने सुचविलेल्या शिफारशींबाबत प्रस्ताव पाठविण्यात येईल. त्यानंतर या बाजार समिती नियमनमुक्तीच्या अध्यादेशात बदल करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. बैठकीस ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, आमदार राहुल अहेर, माजी खासदार देवीदास पिंगळे, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद कृषी सभापती केदा अहेर, पाशा पटेल, गोविंद पगार यांच्यासह राज्यभरातील या समितीचे सदस्य उपस्थित होते. दरम्यान, कांदा गोणीत आणला तरच लिलाव पुकारण्याची घेतलेली व्यापाऱ्यांची भूमिका आडमुठी व शेतकरी विरोधी असल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विरोध केला आहे. आता मुख्यमंत्री याबाबत काय निर्णय घेतात, त्यावरच बाजार समिती नियमनमुक्ती अध्यादेशात सुधारणा व कांदा गोणी लिलावाचे भवितव्य अवलंबून आहे. (प्रतिनिधी)