याबाबत खोबळा (दिगर) येथील पोलीस पाटील रमण काशीनाथ गोबाले यांनी सांगितले की, तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागातील खिर्डी भाटीचा खिरपाडा येथील रामजू प्रधान कुवर (६५) हे १५ ऑगस्ट २०२१ रोजी गुजरातमधील धरमपूर येथील पाचवीरा येथे मुलीकडे पाहुणे म्हणून गेले होते. तिकडून परत आल्यानंतर खिरपाडा येथील पूर आलेल्या नार नदीपात्रात उतरत असताना पाय घसरल्याने रामजू हे नदीच्या प्रवाहात वाहून गेले. घरी परतण्यास उशीर झाल्याने नातेवाइकांनी दोन दिवसांपासून शोधाशोध सुरू केली होती. मात्र, ते कोठेही आढळून आले नाहीत. अखेर त्यांचा मृतदेह दि.१७ रोजी चार वाजेदरम्यान नदीमधील लव्हाळीला अडकला असल्याचे नदीच्या काठावर खेकडी व मासे पकडण्यासाठी गेलेल्या आदिवासी बांधवांना दिसून आला. आकस्मित मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, याठिकाणी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.
फोटो- १९ सुरगाणा रेन
नार नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढताना ग्रामस्थ.
190821\19nsk_37_19082021_13.jpg
फोटो- १९ सुरगाणा रेन नार नदी पात्रातून मृतदेह बाहेर काढतांना ग्रामस्थ.