शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

दस्त चोरीप्रकरणी एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:26 IST

संशयित पवार याच्या मदतीने संशयित विजय दत्तात्रय भागवत आणि दत्तात्रय सहादू भागवत या दोघांनी संगनमताने मृत सुधाकर बळवंत पाटील ...

संशयित पवार याच्या मदतीने संशयित विजय दत्तात्रय भागवत आणि दत्तात्रय सहादू भागवत या दोघांनी संगनमताने मृत सुधाकर बळवंत पाटील यांच्या देवळाली कॅम्पमधील शेतजमिनीविषयीचे बनावट रद्दबातल खरेदीखत तयार केल्याची फिर्याद अंकुश सुधाकर पाटील यांनी पोलीस आयुक्तांकडे केली आहे. त्यांच्या तक्रार अर्जाची दखल घेत आयुक्तांच्या आदेशान्वये पाटील यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी विजय भागवत याला सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे. भागवत याने पवारच्या मदतीने बनावट दस्त तयार केल्याचा पोलिसांना संशय आहे. अभिलेख कार्यालयातून गहाळ झालेले महत्त्वाच्या सरकारी दस्तऐवजामागेही या प्रकरणाचा संबंध असल्याची शक्यता नाकारता येत नाही. पाटील यांच्या वारसाची नोंद रद्दबातल ठरविण्यासाठी बनावट दस्त सादर करून संशयित भागवत याने देवळाली मंडल अधिकारी यांच्या कार्यालयात २०१७ साली आक्षेप घेतला होता; मात्र ज्या दस्तांच्या आधारे आक्षेप घेतला गेला, ते दस्तऐवज बनावट असल्याचे दुय्यम निबंधक वर्ग-२ नाशिक यांनी सिद्ध केले आहे. कार्यालयाने याबाबत सुनावणीही घेतली आहे. दरम्यान, या प्रकरणी विजय भागवत यास न्यायालयात पोलिसांनी हजर केले असता न्यायालयाने त्यास तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यास आज, शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. तसेच हा गुन्हा आता सरकारवाडा पोलिसांकडून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.