येवला : अनकाई शिवारात शेतीच्या वादातून रामेश्वर भागुजी जाधव (५४) यांच्या खून प्रकरणी सचिन बाबू जाधव याला येवला न्यायालयाने शुक्र वारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. भाऊबंदकीच्या वादातून रामेश्वर जाधव यांचा खून झाला असल्याची फिर्याद प्रथम मनमाड शहर पोलिसात दाखल होती. बुधवारी हा गुन्हा येवला पोलिसात वर्ग करण्यात आला. प्रभाकर जाधव राहणार अनकाई यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले की, आपल्या वडिलांना लाथाबुक्याने मारहाण करून सचिन जाधवने जीवे ठार मारले. या प्रकरणी अनकाई येथील संशयित आरोपी सचिन बाबू जाधव याला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत अटक केली. येवला न्यायालयाने त्याला शुक्र वारपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.
अनकाई येथील खून प्रकरणी एकास अटक
By admin | Updated: August 18, 2016 01:51 IST