शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यांनी केला आळस; ठेकेदाराने गाठला कळस

By admin | Updated: September 12, 2014 00:10 IST

अधिकाऱ्यांनी केला आळस; ठेकेदाराने गाठला कळस

आझादनगर : येथील महानगरपालिकेच्या बांधकाम, विभागाच्या नाकर्तेपणामुळे आझादनगर पोलीस ठाणे ते अलीअकबर दवाखान्यापर्यंत नाल्याचे सहा महिने मुदतीचे काम तब्बल दीड वर्षे उलटूनही अपूर्ण असताना ठेकेदारास २५ टक्के रक्कम अदा करण्यात आली. विशेष म्हणजे त्यास काम पूर्ण करण्याची साधी ताकीदही देण्यात आलेली नाही. यामुळे मनपा अधिकाऱ्यांच्या उदासीनतेविषयी नागरिकांत चर्चा सुरू असून, महापालिकेची अशी अनेक प्रकरणे पडून असल्याचे निदर्शनास आले आहे.आझादनगर पोलीस ठाणे ते अली अकबर हॉस्पिटलपर्यंतचा नाला बांधण्यासाठी शासनाच्या डी. पी. आर. योजनेअंतर्गत सुमारे २१ लाख ९२ हजार २९९ रुपयास ठेका देण्यात आला. या कामासाठी मनपाकडून ठेकेदारास १२ मार्च रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आले. या कार्याआदेशानुसार संबंधित ठेकेदारास सदर काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली होती. यासाठी उपायुक्त आदेश क्र. ४३/दि.२६/१२/१२ अन्वये मान्यता देत सदर कामाची तीव वर्षासाठी देखभाल करण्यासह बांधकाम ठेका देण्यात आला. यासाठी मनपा महासभा ठराव क्र.३७८/दि.२१/९/२०१३ रोजी मंजुरीही देण्यात आली. परंतु ठेकेदाराने तब्बल एक वर्ष उलटून गेले तरी कामास प्रत्यक्ष सुरुवातही केली नव्हती. सुमारे पाच महिन्यांपूर्वी सदर कामास प्रत्यक्ष प्रारंभ केला; परंतु अद्याप पावेतो आझादनगर पोलीस ठाणे ते तवक्कल मशिदपर्यंतचे काम पूर्ण केलेले आहे. जे काम झाले तेही निकृष्ठ दर्जाचे आहे. मनपाकडून झालेले कामाचा दर्जा न तपासता २५ टक्के रक्कम अदा करण्यात आली. विशेष म्हणजे सदर काम उन्नती कन्स्ट्रक्शन या संस्थेस दिले गेले होते. मनपा व सदर ठेकेदार यांच्यात झालेल्या करारनाम्यानुसार सहा महिन्यांत काम पूर्ण न झाल्यास या कामास प्रति दिवस ७५० रुपये दंड आकारण्यात येईल, असे त्यात म्हटले असताना त्यांना दंडाची रक्कम वसूल करण्याबाबत साधी नोटीसही देण्यात आलेली नाही. म्हणून या कामात मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची शंका नागरिकांत व्यक्त होत असून सदर कामाची चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य कारवाई करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत. (प्रतिनिधी)