शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अवघा रंग एक झाला... गाणपर्वणी : ‘जयपूर-अत्रौली’ गायकीच्या संगमाने श्रोते मुग्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 01:20 IST

नाशिक : ‘मारवा’ रागामधील ‘पिया मोरे अनंत देस...’ या बडा ख्यालप्रकारातील बंदिशीपासून सुरू झालेली ‘गाणपर्वणी’ मैफ ल उत्तरोत्तर खुलत गेली.

ठळक मुद्देसुमधुर शास्त्रीय गीतगायन मैफलस्वरांच्या बरसातमध्ये श्रोते चिंब झाले

नाशिक : ‘मारवा’ रागामधील ‘पिया मोरे अनंत देस...’ या बडा ख्यालप्रकारातील बंदिशीपासून सुरू झालेली ‘गाणपर्वणी’ मैफ ल उत्तरोत्तर खुलत गेली. या मैफलीतून जयपूर-अत्रौली घराण्याच्या गायकीचा आगळा संगम अनुभवत उपस्थित श्रोते पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या शास्त्रीय गायनात मंत्रमुग्ध झाले. निमित्त होते, गानसरस्वती दिवंगत किशोरीताई अमोणकर यांचा प्रदीर्घ सहवास लाभलेले त्यांचे शिष्य पंडित रघुनंदन पणशीकरांच्या सुमधुर शास्त्रीय गीतगायन मैफलीचे. शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग व एन.सी.पी.ए. मुंबईयांच्या संयुक्त विद्यमाने शंकराचार्य संकुलामध्ये शनिवारी (दि.१०) पार पडलेल्या ‘गाणपर्वणी’ मैफलीचे. जयपूर-अत्रौली गायकीचे साधक असलेले पणशीकर यांनी आपल्या खास शैलीत मारवा रागामधील बंदीश सादर करत मैफलीला प्रारंभ केला. त्यांच्या या बंदिशीने उपस्थित श्रोत्यांची दाद मिळविली. सुरेल-निकोप व तीनही सप्तकांत लीलया फिरणाºया त्यांच्या स्वरांच्या बरसातमध्ये श्रोते चिंब झाले. यावेळी त्यांनी आपल्या गायनातून जयपुरी लयकारीच्या पुढे जात स्वरांना जणू स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची अनुभूती आपल्या पेशकारीतून उपस्थित श्रोत्यांना दिली. दरम्यान, जयपूर घराण्याच्या गायकीमधील खास मानली जाणारी किशोरीताई अमोणकर यांनी रचलेली यमन रागातील मो मन लगन लगी... ही बंदीश सादर करून पणशीकर यांनी श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळविली. मैफलीच्या अंतिम टप्प्यात संत सोयराबाई यांची रचना असलेली व किशोरीताई यांनी स्वरबद्ध केलेली भैरवी रागातील ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग..’ या बंदिशीने मैफलीची उंची गाठली. पंडित चंद्रकांत कामत यांचे शिष्य भरत कामत (तबला), पंडित तुळशीदास बोरकर यांचे शिष्य निरंजन लेले (संवादिनी), विनोद कुलकर्णी, नेहा सराफ (तानपुरा) यांनी पणशीकरांच्या गायकीला कौशल्यपूर्ण साथसंगत करत मैफलीत रंग भरला.