शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरकडून महिला रुग्णासोबत अश्लील वर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:25 IST

--- घरफोडीत ५० हजारांची रोकड लंपास नाशिक : भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजारांच्या रोकडवर डल्ला मारल्याची घटना अशोक ...

---

घरफोडीत ५० हजारांची रोकड लंपास

नाशिक : भरदिवसा झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५० हजारांच्या रोकडवर डल्ला मारल्याची घटना अशोक मार्ग परिसरात घडली. कुटुंबीय बाहेरगावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी ही घरफोडी केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अब्बास यासीन कादरी (रा.अमिन टॉवर) यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. कादरी कुटुंबीय रविवारी (दि.२८) सकाळी संगमनेरला गेले होते. त्यामुळे त्यांचे बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत बेडरूममधील कपाटातून ५० हजाराची रोकड चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

---

दोन दुचाकी पळविल्या

नाशिक : शहरात मोटरसायकल चोरीची मालिका सुरूच असून चोरट्यांनी दोन दुचाकी चोरून नेल्या. याप्रकरणी नाशिकरोड आणि अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जेलरोड भागातील अनिल लीलाचंद भावसार (रा. प्रथमेश अपा. त्रिवेणी पार्क) यांची अ‍ॅक्टिव्हा (एमएच १५ ईएम ३४७७) शुक्रवारी (दि.२६) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरी घटना सिडकोत घडली. पंडित नगर भागात राहमारे मंगेश मधुकर शिंदे यांची होंडा शाईन (एमएच १५ जीएस ७७४८) दुचाकी रात्रीच्या वेळी त्यांच्या घरासमोरून चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---

संत कबिरनगरला महिलेची आत्महत्या

नाशिक : संत कबिरनगर येथे राहणाऱ्या एका २४ वर्षी महिलेने गळफास लावून घेत आत्महत्या केली. या महिलेच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोहिनी उमेश लहांगे (रा.भोसला स्कूल समोर) असे मयत महिलेचे नाव आहे. लहांगे या महिलेने सोमवारी (दि.१) सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात लोखंडी गजाला ओढणी बांधून गळफास लावून घेतला होता. विजय भगरे यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.