शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गौणखनिजापोटी १०५ कोटींचे उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:50 IST

चालू आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातून गौणखनिजाच्या रॉयल्टीपोटी (स्वामित्वधन) १०५ कोटी रुपयांचा महसूल शासनाला अपेक्षित असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदाचे उद्दिष्ट अधिक असल्याने त्याची वसुली कशी होईल, असा प्रश्न आत्तापासूनच यंत्रणेला पडला आहे.

नाशिक : चालू आर्थिक वर्षात नाशिक जिल्ह्यातून गौणखनिजाच्या रॉयल्टीपोटी (स्वामित्वधन) १०५ कोटी रुपयांचा महसूल शासनाला अपेक्षित असून, गेल्या वर्षीपेक्षा यंदाचे उद्दिष्ट अधिक असल्याने त्याची वसुली कशी होईल, असा प्रश्न आत्तापासूनच यंत्रणेला पडला आहे.जिल्ह्यात वर्षागणिक वाळू ठिय्ये कमी होत चालले असून, सध्या जेमतेम २५ ठिय्ये अस्तित्वात आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात यातील चार ते पाचच ठिय्यांचे लिलाव होऊ शकले व त्यातून सव्वा ते दीड कोटीचा महसूल मिळू शकला होता. गेल्या वर्षी गौणखनिजापोटी ८९ कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले होते, हे उद्दिष्ट गाठताना खनिकर्म शाखेची प्रचंड दमछाक झाली. जिल्ह्यात चोरी, छुप्या मार्गाने येणाºया बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर दंडात्मक कारवाई, खाणीतून दगडांचा उपसा, क्रशरचालकांनी निर्माण केलेल्या खडीचे स्वामित्वधन यातून गौणखनिजाची वसुली करण्यात आली, परंतु तीदेखील पुरेशी नसल्याने अखेरच्या क्षणी इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाच्या बांधकामासाठी लागणाºया गौणखनिजावर आकारण्यात आलेल्या स्वामित्वधनापोटी प्रशासनाला ३२ कोटी रुपये मिळाल्याने गेल्या वर्षी कसेबसे उद्दिष्टापर्यंत पोहोचता आले. यंदा मात्र गेल्या वर्षी गौणखनिजापोटी वसूल केलेल्या रकमेपेक्षाही अधिक उद्दिष्ट देण्यात आल्याने ते कसे पूर्ण होणार याची काळजी आत्तापासूनच यंत्रणेला भेडसावत आहे. नोव्हेंबरनंतरच्या नोटाबंदीने अद्यापही बांधकाम क्षेत्र सावरलेले नाही तर सरकारनेदेखील विकासकामांच्या खर्चावर कात्री लावल्यामुळे नवीन मोठे प्रकल्प जिल्ह्यात यंदा सुरू होण्याची शाश्वती नाही अशा परिस्थितीत वाळू, खडी, माती या गौणखनिजाच्या वापरावरच मर्यादा आल्याने त्यातून रॉयल्टी कशी मिळणार असा प्रश्न केला जात आहे.