शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

आता टर्नओव्हर टॅक्सलाही विरोध

By admin | Updated: November 2, 2014 23:37 IST

उद्या फामची बैठक : मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

नाशिक : व्यापारीवर्गाचा विरोध असलेला स्थानिक संस्था कर म्हणजेच एलबीटी हटविण्याची तयारी नव्या राज्य सरकारने केली आणि त्याला पर्याय म्हणून टर्नओव्हर टॅक्स आणणयाचे ठरविले; परंतु व्यापाऱ्यांची शीर्ष संघटना असलेल्या फामचा या दोन्ही करांना विरोध आहे. त्यासंदर्भात मंगळवारी (दि. ४) मुंबई येथे फामच्या बैठकीत एलबीटीच्या विरोधात अंतिम एल्गार पुकारला जाणार आहे. त्यानंतर दुपारीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी सुरू आहे.गेल्या वर्षीपासून राज्यात मुंबई वगळता सर्वत्र जकात रद्द करून त्याला पर्याय असलेला एलबीटी लागू करण्यात आला. उद्योजक आणि महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्सने त्याला फारसा विरोध केला नाही; मात्र व्यापाऱ्यांनी त्यास सुरुवातीपासूनच कडक विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. अनेकदा त्यावर आंदोलने करण्यात आली. आघाडी सरकार हा कर हटवू न शकल्याने व्यापाऱ्यांनी लोकसभा निवडणुकीत राज्यस्तरावर सत्ताधिकाऱ्यांच्या विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत अपयश आल्यानंतर आघाडी सरकारने हा तिढा सोडविण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात फारसे यश आले नाही. त्यामुळे त्यांनी महापालिकांनाच जकात की एलबीटी याचा पर्याय देण्याचे जाहीर केले. त्यामुळे व्यापारी पुन्हा संतप्त झाले. विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपाने व्यापाऱ्यांना सत्ता आल्यास रद्द करू असे आश्वासन दिलेच; परंतु मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर त्यांनी तातडीने एलबीटी रद्द करतानाच टर्नओव्हर टॅक्स लागू करण्याचा विचार असल्याचे जाहीर केले. नवीन सरकार आल्याने आता एलबीटी तातडीने रद्द करावा या मागणीसाठी फामची महत्त्वाची बैठक मंगळवारी (दि. ४) नवी मुंबईतील वाशी येथे होणार आहे. २६ महापालिकांमधील व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी यात सहभागी होणार असून, यावेळी एलबीटी तातडीने रद्द करावा अशी मागणी केली जाणार आहे. बैठकीनंतर दुपारी तीन वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. अर्थात, एलबीटी रद्द करताना अन्य कोणताही पर्यायी कर लावण्यास फामचा विरोध आहे, असे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी सांगितले. त्यामुळे एलबीटीच्या विरोधापाठोपाठ प्रस्तावित टर्नओव्हर टॅक्सलाही विरोध होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)