शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

आता कालिकादेवीचे आॅनलाइन दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:27 IST

शहराची ग्रामदेवता कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा आॅनलाइन दर्शन सुरू करण्यात येणार आहे. शिर्डीसह अन्य धार्मिक स्थळांच्या धर्तीवर ही सुविधा असली तरी सशुल्क सेवा असणार आहे. याशिवाय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नूतन भक्तनिवासाचे काम पूर्ण झाल्याने तेही भाविकांसाठी खुले करून देण्यात येणार आहे.

नाशिक : शहराची ग्रामदेवता कालिकादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदा आॅनलाइन दर्शन सुरू करण्यात येणार आहे. शिर्डीसह अन्य धार्मिक स्थळांच्या धर्तीवर ही सुविधा असली तरी सशुल्क सेवा असणार आहे. याशिवाय नवरात्राच्या पार्श्वभूमीवर नूतन भक्तनिवासाचे काम पूर्ण झाल्याने तेही भाविकांसाठी खुले करून देण्यात येणार आहे.शिर्डी, पंढरपूर, बालाजी आदी देवस्थानांप्रमाणेच कालिकादेवीचे आॅनलाइन दर्शन घेता यावे, पूजा, अभिषेक करता यावा, आरतीत सहभागी होता यावे यासाठी या वर्षापासून ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासंबंधीची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, सुविधेची अंमलबजावणी नवरात्रीच्या पहिल्या माळेपासूनच करण्याचे नियोजन असल्याचेही समजते. कामाच्या व्यस्ततेमुळे प्रत्यक्ष दर्शनासाठी वेळ देऊ न शकणाºया, शहरापासून दूर असणाºया भाविकांना शंभर ते दोनशे रूपये शुल्क मोजून आॅनलाइन दर्शनाचा लाभ घेता येऊ शकेल, असे नियोजन आहे. कालिका मंदिर आवारात मंदिर ट्रस्टतर्फे नव्याने बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाच्या रंगरंगोटीचे काम सध्या सुरू असून, तेही पहिल्या माळेपासून भाविकांसाठी खुले करून देण्यात येणार आहे. भक्तनिवासात हॉल व स्वतंत्र खोल्या, प्रसाधनगृहे आदिंची सोय असून, भाविकांबरोबरच मंदिर परिसरातील दवाखान्यांमध्ये उपचारासाठी येणाºया रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांनाही नाममात्र दरात निवासाची सोय उपलब्ध होणार आहे. नवरात्र काळात मंदिराच्या भोजनगृहात नेहेमीप्रमाणे महाप्रसाद सुरु असणार असून, भाविकांबरोबरच यंदा परिसरातील दवाखान्यांमधील रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांसाठी नाममात्र दरात जेवण पुरविण्याचे नियोजनही करण्यात आले आहे. या सुविधेचाही प्रारंभ नवरात्रीच्या पहिल्या माळेपासून होण्याची योजना आहे.