शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

आता ‘दंडुका’ फिरविण्याची गरज

By admin | Updated: December 20, 2015 22:28 IST

गुन्हेगार मोकाट : नागरिकांच्या भावना तीव्र

पंचवटी : परिसरात गेल्या काही दिवसांपासून सशस्त्र टोळक्याने डोकेवर काढण्यास सुरुवात केल्याने पोलीसही हतबल झाले आहेत. पोलिसांनी कारवाई करूनही गुन्हेगार मागे हटत नसल्याने अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांना ‘दंडुका’ फिरविण्याची नितांत गरज असल्याचे सर्वसामान्य नागरिकांत बोलले जात आहे. कधी लूटमारीच्या इराद्याने तर कधी घातपात करण्याच्या इराद्याने फिरणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास पोलिसांना यश आले असले तरी प्रत्यक्षात गुन्हेगारीच्या घटना घडल्यानंतरच पोलिसांनी या संशयितांना जेरबंद केल्याचे दिसून येत आहे. हातात धारदार शस्त्रास्त्रे घेऊन उघडपणे दहशत निर्माण करणारी टोळी तसेच शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणारे टोळके आजही खुलेआम फिरत आहेत अशा संशयितांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असली तरी काही गुन्ह्यात पोलिसांकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने गुन्हेगारांचे मनोधैर्य वाढतच आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये भय कायम आहे. पोलिसांनी गुन्हेगारांवर कारवाई करण्यापाठोपाठ दंडुका फिरविला तर निश्चितपणे काही प्रमाणात का होईना गुंडप्रवृत्तीच्या टोळक्यावर पोलिसांना वचक बसविण्यास मदत होईल. रात्री उशिरापावेतो सुरू असलेल्या पानटपऱ्या, हॉटेल्स, हातगाड्यांवर उभे राहणारे टोळके तसेच रात्रीच्या सुमाराला चौकाचौकात बसणाऱ्या गुंडप्रवृत्तीच्या टोळक्याविरुद्ध कारवाई सुरू केल्यास गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे पंचवटी पोलिसांना सहज शक्य होईल. (वार्ताहर)