शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

आता वाहनतळ जागेचा तिढा

By admin | Updated: January 12, 2015 00:53 IST

सिंहस्थ कुंभमेळा : भाडेदरावरून वाद; मालकांना हवे साधुग्राम अधिग्रहित जागेचेच मोल

नाशिक : तपोवनात साधुग्रामसाठी अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी प्रशासनाने जाहीर केलेल्या भाड्याच्या दराइतकेच दर वाहनतळासाठी अधिग्रहीत करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी देण्यात यावे, अशी जागामालकांनी मागणी करण्यास सुरुवात केल्याने वाहनतळाच्या जागेचा वाद नव्याने उभा राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांना शाही पर्वणीच्या काळात तीन दिवस शहरात गर्दीमुळे प्रवेश नाकारण्यात येणार असल्यामुळे अशा वाहनांना शहराबाहेरच उभे करण्यासाठी प्रमुख रस्त्यांवर अकरा वाहनतळ तयार करण्यात येणार आहे. प्राधिकृत अधिकाऱ्यामार्फत म्हणजेच तहसीलदारांमार्फत वाहनतळासाठी तात्पुरत्या स्वरूपात भाड्याने जागा अधिग्रहीत करण्यात येणार असून, त्याची प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नसली तरी, वाहनतळासाठी जागा अधिग्रहीत करून त्याचे सपाटीकरण, मजबुतीकरण, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृह, निवाराशेड अशा विविध प्रकारच्या सोयी या ठिकाणी करण्यात येणार असल्याने साधारणत: मार्च महिन्यांपर्यंत वाहनतळासाठी जागा अधिग्रहीत करून ती महापालिका व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात देण्याचे नियोजन आहे. परंतु ज्याप्रमाणे तपोवनातील जागेचा तिढा वाढत गेला त्याचप्रमाणे वाहनतळासाठी जागा अधिग्रहण करणेही जिकरीचे वाटू लागले असून, तपोवनातील शेतकऱ्यांना प्रशासनाने १० लाख ५६ हजार रुपये भाडे देऊ केले, परंतु वाहनतळासाठीच्या जागेचे दर अद्याप निश्चित केलेले नाहीत. दोन्ही दर एकाच वेळी निश्चित करून जाहीर केले असते तर कदाचित वाद निर्माण झाला असता. ते टाळण्यासाठी प्रशासनाने खेळी करीत तपोवनातील दर निश्चित केले व येथील जागा अधिग्रहीत झाल्यानंतरच वाहनतळासाठी जागा अधिग्रहीत करण्याचे ठरविण्यात आले आहे; परंतु ज्याप्रमाणे तपोवनातील जागेला मोबदला दिला जाईल त्याचप्रमाणे वाहनतळाच्या जागेलाही मिळावा, अशी मागणी सुरू झाली आहे. शहराला मिळणाऱ्या पुणे, मुंबई, पेठ, औरंगाबाद, दिंडोरी, मालेगाव, त्र्यंबकेश्वर या रस्त्यावर सुमारे अकरा वाहनतळ उभारण्यात येणार आहेत. त्यासाठी रस्त्यालगतच जागा मुक्रर करण्यात आल्या असून, त्यातील बहुतांशी जागा शेतजमिनी आहेत. या जागांचे सपाटीकरण व त्यांना मुख्य रस्त्याशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या जमिनींवर होणारे तात्पुरते बांधकाम व त्यातून होणारे नुकसानीशी निगडीतच मोबदला मिळावा, अशी मागणी जागामालकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)