शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
2
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
3
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
4
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
5
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
6
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
7
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
8
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
9
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
10
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
11
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
12
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
13
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
14
कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
15
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
16
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
17
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
18
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
19
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
20
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
Daily Top 2Weekly Top 5

आता मुख्य अभियंता जबाबदार

By admin | Updated: August 11, 2014 00:53 IST

आता मुख्य अभियंता जबाबदार

 

नाशिक : पूररेषेच्या अर्थात ब्लू लाइनच्या आत निषिद्ध क्षेत्रात पूल, रस्ते, उद्यान, जॉगिंग ट्रॅक यांसारख्या अपरिहार्य असलेल्या बांधकामांसाठी आता जलसंपदा विभागाच्या क्षेत्रीय मुख्य अभियंत्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक करण्यात आले असून, भविष्यात पूररेषेतील कोणत्याही परिणामास मुख्य अभियंत्याला जबाबदार धरण्याचा निर्णय शासनाच्या जलसंपदा विभागाने घेतला आहे. विशेष म्हणजे, शासनाने मुख्य अभियंता स्तरापेक्षा खालील दर्जाच्या अधिकाऱ्यांना असे प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसल्याचे स्पष्ट करत मुख्य अभियंत्यावरच जबाबदारी निश्चित केली आहे. शहराच्या अथवा तीर्थक्षेत्र विकासाच्या दृष्टीने नदीवर पूल बांधणे, पुलाच्या दोन्ही बाजूचे पोहोच रस्ते तयार करणे, शहर विकास आराखड्यानुसार नदीच्या बाजूने जाणारे रस्ते, उद्याने व जॉगिंग ट्रॅक तयार करणे तसेच पूर संरक्षक कामांतर्गत नदीच्या तीरालगत संरक्षक भिंती बांधणे, घाट बांधणे, नदीच्या कडेने ड्रेनेज पाइपलाइन टाकणे आदि स्वरूपाची अपरिहार्य कामे नदीच्या पूररेषेत करावी लागतात. पूर प्रभावित क्षेत्र व निषिद्ध क्षेत्रात विविध विभागांकडून काही अपरिहार्य कामे करणे आवश्यक असल्यास अशा कामांसाठी जलसंपदा विभागांतर्गत क्षेत्रीय मुख्य अभियंता यांच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक करण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला असून, तसे परिपत्रकही जारी केले आहे. मुख्य अभियंत्याला ना हरकत प्रमाणपत्र देताना धरण सुरक्षा संहितेतील संबंधित तरतुदी, प्रचलित कायदे व नियम, वेळोवेळी शासनाने निर्गमित केलेले आदेश यांचा विचार करावा लागणार असून, भविष्यात प्रस्तावित कामांना व परिसराला कोणताही धोका पोहोचणार नाही याचीही खात्री करावी लागणार आहे. मात्र, मुख्य अभियंत्याकडून बांधकामासाठी ना हरकत प्रमाणपत्र मिळविले तरी बांधकामासाठी आवश्यक त्या परवानग्या व इतर विभागांचे ना हरकत प्रमाणपत्र घेणेही संबंधित विभागांना तितकेच अत्यावश्यक करण्यात आले आहे. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पूररेषेसंबंधीचा प्रश्न नेहमीच चर्चेत राहत आला आहे. सध्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीवर घाट बांधण्याची कामे सुरू आहेत; शिवाय राज ठाकरे यांच्या महत्त्वाकांक्षी गोदापार्क प्रकल्पाच्या बांधकामाचा घाट सुरू आहे. यासह नव्याने करण्यात येणाऱ्या कामांबाबत महापालिकेला मुख्य अभियंत्याकडून ना हरकत प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक झाले आहे. (प्रतिनिधी)