नाशिक : मालेगाव आणि नाशिक येथील नागरिकांचा असलेला ऋणाणुबंध लक्षात घेता परिवहन महामंडळानेही खास थेट बससेवा सुरू केली असून, ती बस दररोज नाशिक ते मालेगाव अशा १२ फेऱ्या मारणार आहे. नाशिकहून मालेगाव येथे जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रवाशांची संख्या तसेच त्यासाठी लागणार वेळ बघता हा वेळ कमी व्हावा व प्रवासी जलदगतीने पोहोचावे यासाठी मालेगाव आगारातर्फे ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एक बस खास उपलब्ध करून देण्यात आली असून, दीड तासात ती एकीकडचा प्रवास पूर्ण करेल. दिवसभरात दहा फेऱ्या मारणाऱ्या बसमधून सुमारे १२०० प्रवाशांची वाहतूक केली जाईल. यामुळे उन्हाळ्याच्या सुटीत मालेगाव येथे जाणाऱ्या तसेच मालेगाव येथून नाशिकला येणाऱ्या प्रवाशांची सोय होऊ शकेल. खासगी वाहतुकीतून प्रवाशांची होणारी वाहतूक मोठ्या प्रमाणात असल्याने उत्पन्न वाढीसाठीही महामंडळाने हा उपाय केला आहे. त्याद्वारे केवळ दीड तासात नाशिक मालेगाव अंतर कापले जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांचाही वेळ वाचणार आहे.
आता मालेगावसाठी थेट बससेवा
By admin | Updated: April 8, 2015 01:07 IST