शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण केलेल्या उद्योजकांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:15 IST

लहान-मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या बाहेर सामासिक अंतरात वाहनांसाठी उभारलेले पार्किंग त्वरित हटविण्याच्या नोटिसा एमआयडीसीने पाठविल्या असून, आता पार्किंगची सोय कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सातपूर : लहान-मोठ्या उद्योगांनी कंपनीच्या बाहेर सामासिक अंतरात वाहनांसाठी उभारलेले पार्किंग त्वरित हटविण्याच्या नोटिसा एमआयडीसीने पाठविल्या असून, आता पार्किंगची सोय कुठे करावी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.  सातपूर व अंबड औद्योगिक वसाहतीत बहुतांश लहान-मोठ्या उद्योजकांनी रस्ता आणि कंपनी या सामासिक अंतरात स्वत:च्या आणि कामगारांच्या वाहनांसाठी पार्किंग शेड उभारलेले आहेत. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने अशा उद्योगांना नोटिसा पाठविल्या असून, सामासिक अंतरातील अनधिकृत पार्किंग काढून घेण्यात यावे आणि एमआयडीसीने दिलेल्या जागेतच (कंपनीच्या आत) पार्किंगची व्यवस्था करावी. सात दिवसांच्या आत अनधिकृत पार्किंग हटविण्याचे या नोटिसीत नमूद करण्यात आले आहे. यात बऱ्याच मोठ्या उद्योगांनी सामासिक अंतरात सर्रास वाहनतळ उभारले आहे. त्यांनाही कंपनीच्या आतमध्ये पार्किंगची व्यवस्था करावी लागणार आहे. नोटिसा आलेल्या उद्योजकांनी निमाकडे धाव घेतली आहे. आपल्या कंपनीच्या बाहेर आपली वाहने लावणे चुकीचे नसल्याचे मत उद्योजकांनी व्यक्त केले आहे.उद्योजकांकडून आश्चर्य व्यक्तएरव्ही औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाºयांवर निष्काळजी आणि निष्क्रिय असल्याचा आरोप केला जातो. प्रत्यक्षात रविवार साप्ताहिक सुटीचा दिवस असूनही या कर्मचाºयांनी उद्योजकांना नोटिसा बजावण्याचे कर्तव्य पार पाडल्याने उद्योजकांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.एमआयडीसीने उद्योजकांना पाठविलेल्या नोटिसा चुकीच्या आहेत. उलट कंपनी मालक सामासिक अंतर स्वच्छ ठेवत असतो. पार्किंगच्या जागेवर पेव्हर ब्लॉक लावून पार्किंग करणे गैर नाही. काही उद्योजकांना कंपनीच्या आवारात पार्किंगला जागा नाही. त्यांनी काय करावे? उद्योजकांनी घाबरू नये, निमा त्यांच्या पाठीशी आहे. लवकरच अधीक्षक अभियंता नितीन वानखेडे यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करून यावर मार्ग काढण्यात येईल.- मंगेश पाटणकर, अध्यक्ष, निमा

टॅग्स :MIDCएमआयडीसी