शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा लहाडे यांचे तपासात असहकार्य

By admin | Updated: May 13, 2017 01:24 IST

नाशिक :गर्भपात प्रकरणातील डॉ़ वर्षा लहाडे या तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार पोलिसांनी (दि़१२) न्यायालयात केली़

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : जिल्हा रुग्णालयातील बेकायदेशीर गर्भपात प्रकरणातील संशयित स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ़ वर्षा लहाडे या तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार म्हसरूळ पोलिसांनी शुक्रवारी (दि़१२) न्यायालयात केली़ पोलिसांच्या तक्रारीनंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आरती शिंदे यांनी लहाडे यांच्या पोलीस कोठडीत एक दिवसांची वाढ केली़ डॉ. वर्षा लहाडेविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात एमटीपी कायद्यानुसार तर म्हसरूळ पोलीस स्टेशनमध्ये विनापरवानगी दवाखाना सुरू करणे, गर्भपाताची औषधे व सोनोग्राफी मशीन ठेवणे याबाबत गुन्हा दाखल आहे. सरकारवाडा पोलिसांनी लहाडेकडे चौकशी केल्यानंतर न्यायालयाने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ यानंतर ९ मे रोजी म्हसरूळ पोलिसांनी ताबा घेतला़ न्यायालयाने त्यांना प्रथम तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली होती़ पोलीस कोठडीची मुदत संपल्याने लहाडे यांना न्यायालयात हजर केले असता तपासात सहकार्य करीत नसल्याची तक्रार केल्यानंतर एक दिवसाची पोलीस कोठडी वाढवून देण्यात आली़ दरम्यान, पोलिसांसमोर डॉ़लहाडे यांच्याशी संपर्क असलेले डॉक्टर, भूलतज्ज्ञ, गर्भपाताची औषधे, त्यांचा वापर, गायब करण्यात आलेले सोनोग्राफी मशीनचा शोध घेण्याचे आव्हान आहे़