शनिवारी (दि.३) शहरासाठी केवळ ११ हजार ८० डोस मिळाले हाेते. ते विविध केंद्रांवर वितरित करताना शंभर ते सव्वाशे या प्रमाणात वितरित झाले. त्यामुळे अधिकच गोंधळ उडाला. ऑनलाईन नंबरमध्ये दोनशे, तीनशे नंबर असलेल्यांना प्रत्यक्ष नागरिकांना संबंधित केंद्रावर गेल्यानंतर मात्र केवळ शंभर डोसच असल्याचे सांगितल्यानंतर त्यांना भ्रमंती करावी लागली. अनेकांना पहाटे पाचपासून नंबर लावून थांबल्यानंतर देखील लस मिळाली नाही.
नाशिक शहरातील सुमारे तेरा लाख नागरिकांना दोन डाेस देण्याचे काम महापालिकेला करावे लागणार आहे. त्यासाठी प्रारंभी नवीन बिटको रुग्णालय आणि इंदिरा गांधी रुग्णालयात लसीकरण करण्यास प्रारंभ करण्यात आला.नंतर मात्र केंद्र वाढवण्यात आले. प्रमुख रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्रांत लसीकरण सुरू असतानाच नागरिकांना खूप पायपीट करावी लागत असल्याने नगरसेवकांनी आपापल्या भागात लसीकरण केंद्रे सुरू करावीत यासाठी आग्रह धरला. त्यानुसार केेंद्रे वाढवण्यात आली आहेत. गेल्या पंधरा दिवसात सुमारे पस्तीस ते चाळीस केंद्रे वाढवावी लागली आहेत; मात्र पुरेशा प्रमाणात लस मिळत नाही आणि मिळाली तर त्या इतक्या मोठ्या केंद्रांना वितरित करताना कमी प्रमाणात पुरवल्या जात असल्याने अडचण होत आहे. महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने देखील यासंदर्भात हतबलता व्यक्त केली आहे. शासनाकडून डाेस पुरवल्यानंतरच त्यानुसार वितरित केले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
इन्फो...
दुसऱ्या डोस घेणाऱ्यांचे हाल
नाशिक शहरात १३ लाख नागरिकांना डोस देण्याचे नियोजन असले तरी आत्तापर्यंत ४ लाख ७३ हजार १८२ नागरिकांना डोस देण्यात आले आहेत. यात ३ लाख ६२ हजार १५० नागरिकांना दुसरा तर १ लाख ११ हजार ३२ नागरिकांना दुसरा डाेस देण्यात आला आहे. यातही दुसरा डाेस घेणाऱ्यांनाच अधिक धावपळ करावी लागत आहे.
इन्फो...
केंद्र शासनाने २१ जूनपासून राज्यांना मुबलक लस देण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात २१ ते ३० जून या कालावधीत केवळ ३५ हजार ५४० डाेस मिळाले आहेत. त्यातही दोन हजार डोस हे जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळाले होते. गेल्या चार दिवसांपासून लसीकरण बंद होते आणि शनिवारी (दि.३) प्रचंड गोंधळ उडाला. डोस संपल्याने आता पुन्हा रविवारी (दि.४)लसीकरण बंद असणार आहे.