शहरं
Join us  
Trending Stories
1
२०१९ पासून सोशल मीडियावर डॉक्टरांचं ब्रेनवॉश; व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युल तपासात मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशमध्ये संशयित ४०० बँक खाती तपासली; जम्मू आणि काश्मीरमधील डॉक्टरांचे  लागेबांधे
3
लग्न पुढे ढकलल्यानंतर स्मृती मंधानाने अचानक इंस्टाग्रामवरून काढून टाकल्या 'या' खास पोस्ट
4
Paytm च्या फाऊंडरचं बिल झालं व्हायरल; ₹४०,००० च्या जेवणावर वाचवले ₹१६,०००, कशी झाली ही कमाल
5
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पंकजा मुंडेचे PA अनंत गर्जे यांना अटक, आज कोर्टात हजर करणार !
6
"गोंधळ घालायचा असेल तर येऊ नका...", कार्यक्रमात झालेल्या राड्यानंतर गौतमी पाटीलचं आवाहन
7
IND vs SA : गुवाहाटी कसोटी जिंकण्यासाठी शास्त्रींचा टीम इंडियाला 'अजब-गजब' सल्ला; म्हणाले...
8
अनपेड इंटर्नशिप ते कमी पगाराच्या पहिल्या नोकरीपर्यंत, नवीन लेबर कोडमुळे तरुणांचे बदलणार आयुष्य
9
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex १९५ अंकानी वधारला; Nifty २६,१०० च्या पार, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
Sangli Accident: नशेत राँग साईडने निघाला, ६ गाड्या उडवल्या, अनेक जखमी; संतप्त लोकांनी स्कोडा कार फोडली
11
"मुंबई महापालिकेची ही शेवटची निवडणूक असेल, त्यानंतर..."; राज ठाकरेंचा 'मराठी माणसा'ला सावध राहण्याचा इशारा
12
म्युच्युअल फंडावर टॅक्स कसा लागतो? इक्विटी आणि डेट फंडसाठीचे नियम काय, टॅक्स वाचवण्याचे मार्ग जाणून घ्या
13
भारताच्या 'दुर्गा' सीमेचं रक्षण करणार, चीन सीमेवर महिला कमांडो; १० चौक्या उभ्या राहणार
14
"उदयपूरमध्येच आमची लव्हस्टोरी...", रणवीर सिंहने दीपिकासोबतच्या आठवणींना दिला उजाळा
15
कोण होणार नवीन पोलिस महासंचालक?; सदानंद दाते यांच्या नावाची चर्चा, केंद्राकडे नावे पाठवली
16
आजचे राशीभविष्य, २४ नोव्हेंबर २०२५: मन आनंदी राहील, आर्थिक लाभ होतील, नोकरीत लाभ होतील !
17
'बिग बॉस मराठी ६' लवकरच? कलर्स मराठीने शेअर केला 'धमाकेदार' प्रोमो, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
18
अनंतच्या अनैतिक संबंधाची खात्री झाल्याने ‘ती’  खचली; एकदा अचानक आई वडील घरी पोहचले, तेव्हा...
19
१५ दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता, २ डिसेंबरला लग्न पण त्याआधीच मयुरेशवर काळाने घाला घातला
20
वयाच्या ४१ व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने केलं लग्न, वृंदावन मंदिरात अभिनेत्यासोबत अडकली विवाहबंधनात
Daily Top 2Weekly Top 5

खासगी रुग्णालयांमध्ये ‘नो ॲडमिशन’ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST

नाशिक : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो ...

नाशिक : जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून बहुतांश रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच नाही किंवा असलाच तरी तो केवळ तिथे सध्या असलेल्या ऑक्सिजन बेडवरील रुग्णांना पुरेल इतकाच आहे. त्यामुळे जर कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन बेड हवा असेल, तर त्याला ऑक्सिजन बेड उपलब्ध आहे, पण ऑक्सिजनचा साठा नसल्याने बेड देता येऊ शकत नाही, असे सांगून दाखल करून घेण्यासदेखील असमर्थता व्यक्त करण्यात येऊ लागल्याने आता गंभीर रुग्णांना कोणत्याच खासगी रुग्णालयात प्रवेश मिळेनासा झाला आहे. तर काही रुग्णालयांनी त्यांच्याकडील ऑक्सिजन संपुष्टात येऊ लागल्याने रुग्णांच्या कुटुंबीयांना रुग्ण स्थलांतरित करण्यास सांगितल्याने काही खासगी रुग्णालयांमध्येदेखील गोंधळ निर्माण झाला आहे.

जिल्ह्यातील काही खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनच्या सुरळीत पुरवठ्यात गत आठवड्यापासूनच मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यात बुधवारी झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनची प्रचंड प्रमाणात गळती झाल्याने नाशिकला येणारा ऑक्सिजनचा सर्व साठा शासकीय रुग्णालयांकडे वळविण्यात आला. त्यामुळे खासगी रुग्णालयांना बुधवारी ऑक्सिजनचा पुरवठाच होऊ न शकल्याने अनेक रुग्णालयांमध्ये अत्यंत बिकट समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे बहुतांश रुग्णालयांकडून तर ऑक्सिजन लागणारे रुग्ण दाखल करून घेण्यासदेखील नकार दिला जात आहे. त्यामुळे एचआरसीटी स्कोअर बारापेक्षा अधिक असलेल्या किंवा ऑक्सिजन लागू शकणाऱ्या रुग्णांना दाखल कुठे करायचे हा मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.

तुटवडा नक्की किती ?

गत आठवड्यापासूनच ऑक्सिजनच्या पुरवठ्याची समस्या निर्माण झाली होती. जिल्ह्यात ऑक्सिजनची मागणी गत आठवड्यात शनिवारी १३९ मेट्रिक टन इतकी होती. तर प्रत्यक्षात पुरवठा ८७ मेट्रिक टन इतकाच होता. तब्बल ५२ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा गत आठवड्यातच होता. तसेच हा तुटवडा रुग्णसंख्या वाढीनुसार वाढत जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच पालकमंत्री छगन भुजबळ तसेच अन्य तज्ज्ञांनी दिला होता. त्यानुसार जिल्ह्यात सध्याच्या घडीला किमान ८० मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असल्याचा अंदाज वैद्यकीय तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. तर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बुधवारी सकाळी पत्रकारपरिषदेत ऑक्सिजनचा तुटवडा केवळ १८ मेट्रिक टन असल्याचे सांगितले होते. मग गत आठवड्याच्या तुलनेत जर एक तृतीयांश ऑक्सिजन तुटवडा असेल तर खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनअभावी प्रवेश मिळणे का बंद आहे, त्याचा उलगडाच होईनासा झाला आहे.

इन्फो

आम्हाला ऑक्सिजनचा पुरवठा लवकर उपलब्ध होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. त्यामुळे या परिस्थितीत आपले ऑक्सिजनवरील रुग्ण लवकरात लवकर स्थलांतरित करावेत, असे संदेश काही खासगी रुग्णालयांकडून त्यांच्या कुटुंबीयांना सकाळपासूनच देण्यात आले. त्यामुळे जिथे कुठे ऑक्सिजन असेल, तिथे रुग्ण स्थलांतरित करण्यास प्रारंभ झाला. काही रुग्णालयांमध्ये तर त्यामुळे वादाचे प्रसंगदेखील ओढवले. मात्र, ऑक्सिजन मिळू शकत नसल्याने आम्ही तुम्हाला वेळीच सावध केले असून, यापुढील जबाबदारी कुटुंबीयांची असेल, असेही रुग्णालयांकडून सांगण्यात आले.

इन्फो

रुग्णालयाचे थेट पोलीस स्टेशनला पत्र

पंचवटीतील एका खासगी रुग्णालयावर तर ऑक्सिजन सिलिंडर मिळत नसल्याने रुग्ण स्थलांतरित करण्यासाठी पोलीस स्टेशनचीच मदत मागण्याची वेळ आली. सध्या आमच्याकडील आयसीयू विभागात रुग्णांना ऑक्सिजन सुरू आहे. मात्र, ऑक्सिजन लवकरच संपुष्टात येणार असल्याने ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्यास आमची जबाबदारी राहणार नाही, याची पूर्वकल्पना रुग्णांच्या नातेवाइकांना दिली आहे. त्यामुळे रुग्ण हलवण्यासाठी आपली मदत आणि सहकार्य मिळावे, अशी विनंतीच पंचवटी पोलीस स्टेशनला केली होती.