शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

निऱ्हाळेकरांना भोजापूरच्या पाण्याची आस

By admin | Updated: September 4, 2014 00:07 IST

निऱ्हाळेकरांना भोजापूरच्या पाण्याची आस

निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्वभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झाला नसल्याने सर्व जलस्रोत कोरडे पडले आहेत. वाड्या-वस्त्यांवरील रहिवाशांसाठी व गायी, गुरे-वासरांना पिण्याच्या पाण्यासाठी पाझर तलावांत भोजापूरचे पूरपाणी सोडण्यात यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांच्या बैठकीत करण्यात आली. या मागणीचा ग्रामपंचायतीच्या वतीने ठराव करण्यात आला असून, तो पाटबंधारे विभागाकडे पाठविण्यात आला आहे.परिसरात यंदा तिसऱ्यावर्षीही दुष्काळाचे सावट आहे. पावसाअभावी तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शेतपिकांना रिमझिम पावसाने जीवदान मिळाले आहे. मात्र वाड्या-वस्त्यांवरील ग्रामस्थांना व गुरे-वासरे यांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण भटकंती सुरू झाली आहे. या भागातील सर्वच जलस्रोत कोरडे ठणठणीत असल्याने या बंधाऱ्यांत भोजापूर धरणाचे पाणी पूरचाऱ्यांद्वारे सोडून ते बंधारे भरून द्यावेत, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे. येथील ग्रामपंचायतीच्या कार्यालयात सरपंच सुनीता जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत भोजापूरचे पाणी बंधाऱ्यात सोडण्याच्या मागणीचा ठराव मांडण्याची सूचना उपसरपंच शशिकांत केकाणे यांनी मांडला. त्यास संगीता काकड यांनी अनुमोदन दिले. त्यानंतर हा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला व तो पाटबंधारे विभागाला पाठविण्यात आला आहे.पश्चिम पट्ट्यात पाऊस झाल्याने भोजापूर धरण गेल्या आठवड्यात शंभर टक्के भरले आहे. मात्र तालुक्याच्या पूर्वभागात पावसाळ्याचे तीन महिने संपून गेले तरी पाऊस झाला नसल्याने तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाड्या-वस्त्यांवर पिण्याच्या पाण्याची टंचाई असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. गावासह वाड्या-वस्त्यांवर सुरू असलेला टँकर गेल्या चार दिवसांपूर्वी बंद करण्यात आल्याने रहिवाशांना टंचाईला सामोरे जावे लागते आहे. परिसरातील बंधाऱ्यांमध्ये भोजापूर धरणाच्या चारीद्वारे पाणी सोडल्यास ग्रामस्थांना दिलासा मिळेल व माणसं व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल, अशी मागणी ग्रामस्थाच्या वतीने सरपंच सौ. जाधव यांनी केली आहे. (वार्ताहर)