शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

निफाड तालुका महिला सन्मान सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 16:19 IST

सायखेडा : केवळ कुटुंबातील लोकांच्या हातातील बाहुले राहून चालणार नाही, तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या, नांदेड गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले. निफाड तालुका महिला सन्मान सोहळाप्रसंगी भेंडाळी येथे त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी वैशाली कदम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, दीप्ती वाजे, जि. प. सदस्य वैशाली खुळे, सुलभा पवार, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, रंजना पाटील, कमल राजोळे उपस्थित होत्या.

ठळक मुद्दे भेंडाळीत सन्मान सोहळा : बचत गटांना साहित्य वाटप

सायखेडा : केवळ कुटुंबातील लोकांच्या हातातील बाहुले राहून चालणार नाही, तर आपण आर्थिकदृष्ट्या सक्षम झाले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्यात्या, नांदेड गोदावरी अर्बन बँकेच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी केले. निफाड तालुका महिला सन्मान सोहळाप्रसंगी भेंडाळी येथे त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी वैशाली कदम होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे, दीप्ती वाजे, जि. प. सदस्य वैशाली खुळे, सुलभा पवार, गटशिक्षणाधिकारी सरोज जगताप, रंजना पाटील, कमल राजोळे उपस्थित होत्या.राजश्री पाटील पुढे म्हणाल्या की मेल्यानंतर आपल्यावर क्रि याकर्म करण्यासाठी वंशाला दिवा पाहिजे, असा अट्टहास करून स्त्रीभ्रूण हत्या होते. मुलगा असो की मुलगी त्याच्या कर्तृत्वाने त्याची ओळख निर्माण होते, स्त्री परंपरेचा मोठा इतिहास जगाला आहे. नारी सर्वत्र पूज्यते अशी वैश्विक विचारधारा आहे. महिलांचा सन्मान करून महिला दिन आज जागतिक स्तरावर उत्सव बनू पाहत असला तरी पुरु ष प्रधान संस्कृतीतील अनेक लोकांना हे न पटणारे आहे. त्यामुळे महिलांनी कोणी आपला महिला म्हणून सन्मान करावा, अशी अपेक्षा करण्याऐवजी आपले कार्य पाहून सन्मान केला पाहिजे, अशी उत्तुंग भरारी घ्यावी, निसर्गाने पुरु षांपेक्षा मातृत्वाचा अवयव जास्त देऊन क्षमता सिद्ध करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आहे.निफाड तालुक्यातील विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.यावेळी काथरगाव येथील शीतल काळे या महिला खेळाडूची श्रीलंकेत होणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेसाठी निवड झाली आहे. पती यात नसल्याने निराधार महिलेची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आमदार अनिल कदम यांच्या वतीने ३१ हजार रुपयांची मदत देण्यात आली.तसेच महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असलेल्या तालुक्यातील १५० बचत गटांना शेगडी, पातेले, झाकनी यांचे वाटप केले. महिला सबलीकरनाच्या दृष्टीने आमदार अनिल कदम यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून महिला दिनाच्या निमित्ताने राबविलेल्या स्तुत्य उपक्र माला मोठ्या प्रमाणात महिलांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, प्रांत अधिकारी अर्चना पठारे, सारिका डेर्ले यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्र माचे प्रास्ताविक आमदार अनिल कदम यांनी केले. तर सूत्रसंचालन पेठेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार वैशाली कदम यांनी मानले.चौकटसन्मान करण्यात आलेल्या महिलासन्मानित महिलाशीलाताई दिलीप दिघे,दीपाली अभिजित सुरळीकर,अनुपमा नरेंद्र डेर्ले,अमृता वसंत पवार,मनीषा रोहिदास डावखर,नेहा प्रभाकर खरे,पूनम सुरेश धिंगाने,शीतल विनोद चव्हाण-सनेर,वैशाली वसंत भटमुळे,सुरेखा संपत खालकर,कांचनमाला खंडेराव हुजरे,डॉ. सारिका विजय डेर्ले,डॉ. रूपाली श्रीधर वाघ,अ‍ॅड. अफरोज मोईनवाज शेख,अ‍ॅड. हर्षाली बबन ठुबे,फोटो : भेंडाळी येथे निफाड तालुक्यातील प्रत्येक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मानप्रसंगी नांदेडच्या व्याख्यात्या राजश्री पाटील, वैशाली कदम, जि. प. अध्यक्ष शीतल सांगळे, उपाध्यक्ष नयना गावित, दीप्ती वाजे व सन्मानित महिला.(10भेंडाळी सन्मान)