शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

शाश्वत शेतीसाठी निवडणार आणखी नऊ गावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:30 IST

नाशिक : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी आठ गावे यापूर्वीच निवडण्यात आलेली असली तरी आता आणखी ...

नाशिक : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी आठ गावे यापूर्वीच निवडण्यात आलेली असली तरी आता आणखी ९ गावांचा नव्याने समावेश करण्यासाठीची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे.

कृषी योजनांशी संबंधित कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सोमवारी घेतला. बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना

बनसोड यांच्यासह कृषी विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या चर्चेत आवश्यक विषयांना मंजुरी देण्यात आली, तर काही विषयांसंबंधित सुधारणा करण्याबाबत विचार करण्यात आला. काही योजनांच्या बाबतीत कृषी आयुक्तालय स्तरावर पाठपुरावा करण्याच्यादेखील सूचना देण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमासाठी मार्गदर्शक सूचनेनुसार ४ उपविभागांतील २ याप्रमाणे ८ गावांना फेर तपासणी करण्याच्या अटीवर मंजुरी देण्यात आलेली आहे. अतिरिक्त निवडावयाच्या ९ गावांसाठी कृषी आयुक्तालय स्तरावरून मंजुरी प्राप्त करण्याबाबतचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. राज्य शासनाच्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीने उशिराने प्राप्त झालेल्या ९ प्रस्तावांचा विमा कंपनीने स्वीकार करावा, तसेच नाशिकमधील १६ प्रस्ताव अनावश्यक कारणांसाठी नामंजूर केले आहेत. या प्रस्तावांची विमा कंपनीने फेरपडताळणी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी संबंधित अधिकारी व विमा कंपनीस दिले.

यावेळी झालेल्या चर्चेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे एकूण ३६५ प्रस्ताव युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनीला सादर करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. त्यापैकी २५५ प्रस्ताव मंजूर झाले असून, ५१ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले होते. त्यात अध्यक्षांनी अनावश्यक कारणांसाठी नामंजूर करण्यात आलेले १६ प्रस्ताव फेरपडताळणी करण्यासाठी विमा कंपनीकडे पाठवावेत, अशा सूचना दिल्या.

बैठकीत राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान, कृषी यांत्रिकीकरण, मृद आरोग्य पत्रिका, क्रॉपसॅप योजनेंतर्गत कापूस पिकावरील गुलाबी (शेंदरी) बोंडअळी, गट शेती, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना- पाणलोट, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (सूक्ष्म सिंचन), विकेल ते पिकेल अभियान, संत सावता माळी रयत बाजार अभियान, आत्मनिर्भर भारत पॅकेजअंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना आदी योजनांचा आढावा घेण्यात आला.