केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणासाठी महापालिकेच्यावतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या पूर्व विभागाच्या आरोग्य विभागाच्यावतीने अस्वच्छता करणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाईची धडक मोहीम सुरू केली आहे. त्यानुसार जानेवारी महिन्यात सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ५ जणांवर ३० हजार रुपये, रस्त्यावर घाण करणाऱ्या सहा जणांवर ५ हजार ९०० रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्याकडून एक हजार रुपये, उघड्यावर लघुशंका करणाऱ्या चार जणांवर ८०० रुपये, प्रतिबंधित प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून २० हजार रुपये, मोकळ्या भूखंडावर बांधकाम साहित्य टाकणाऱ्यांकडून पाच हजार रुपये, पाळीव प्राण्याने रस्त्यावर घाण केल्याप्रकरणी दोनशे रुपये, माक्स न वापरणाऱ्या पाच जणांवर एक हजार रुपये दंडाची कारवाई करण्यात आली आहे. सदर मोहीम विभागीय अधिकारी स्वप्निल मुघदवाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय स्वच्छता निरीक्षक सुनील शिरसाठ व कर्मचाऱ्यांनी राबवली.
एका महिन्यात नऊ लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:40 IST